लोकक्रांती ऑनलाइन
हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दि.१६ जून रोजीचा मान्सून संदर्भातील नवीन अंदाज वर्तविला आहे. आरबी समुद्रात चक्रीवादळ झाल्यामुळे मान्सून थोडा लांबला होता परंतु डख यांनी आनंदाची बातमी दिली आहे त्यांच्या अंदाजानुसार मान्सून परत एकदा सक्रिय होणार आहे यंदा पाऊस खूप पडणार आहे शेतकऱ्यांनी चिंता करूनये शेतात खोलवर ओल झाली तरच पेरणी करावी अन्यथा पेरणीची घाई करू नये. पाऊस भाग बदलून रोज वेगवेगळ्या ठिकाणी पडणार आहे.
जोराचे वारे व पाऊस याची शकता आहे
१८ जून पर्यंत जोराचे वारे वाहण्याची शकता आहे लगेच सर्व ठिकाणी पाऊस पडणार नाही. मान्सून २५ जून पासून पूर्ववत होऊन प्रगती पथावर येणार आहे. सर्वच ठिकाणी पाऊस होणार आहे परंतु रोज वेगवेळ्या ठिकाणी पाऊस होणार आहे असा अंदाज डख यांनी व्यक्त केला.
पंजाब डख यांच्या अंदाजानुसार किती तारखेपासून पावसाला सुरुवात होणार
सध्या मान्सूनची स्थिती पूर्ववत होत आहे मान्सून २५ जून रोजी सक्रिय होऊन ३० जून पर्यंत पुढे सरकत सर्वत्र पाऊस होणार आहे. मान्सून चांगल्या प्रकारे सक्रिय होऊन २५ जून पासून १५ जुलै पर्यंत राज्यात सगळीकडे वेगवेगळ्या ठिकाणी दररोज पाऊस होणार आहे. जरी काही ठिकाणी पाऊस झाला नाही तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये राहिलेल्या भागत १५ जुलै पर्यंत सर्वत्र पाऊस होणार आहे. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
दुष्काळ पडण्याची शक्यता नाही शेतकऱ्यांनी काळजी करू नये
या वर्षी पाऊस खूप पडणार असल्यामुळे दुष्काळाची अजिबात शक्यता नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे काही कारण नाही. चक्रीवादळा मुळे मान्सूनची स्थिती पूर्ववत होण्यास पंधरा दिवसांचा कालावधी गेला.वादळामुळे मान्सून थोडा उशीराने पुढे सरकत आहे परंतु मान्सूनची स्थिती पूर्ववत होऊन भरपूर पाऊस होणार आहे असं मत डख यांनी व्यक्त केले.