श्री संत शेख महंमद महाराज पालखी सोहळ्याचे हजारो भाविकांसह श्रीगोंदयातून श्री क्षेत्र पंढरपूर कडे प्रस्थान..!

महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले संत शेख महंमद महाराज यांचा प्रथमच श्रीगोंदा ते पंढरपूर पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पंढरपूरला मार्गस्थ झाला..!

लोकक्रांती ऑनलाइन
श्रीगोंदा दि. १९ जून २०२३ : तालुक्यातील सर्व समाज व धर्मियांचे श्रद्धा असणाऱ्या आणि राष्ट्रीय पातळीवर हिंदु मुस्लिम समाज बांधवांच्या एक्याचे प्रतिक असलेल्या संत शेख महंमद बाबा यांचा पायी दिंडी सोहळा श्रीगोंदा ते पंढरपूर आज रोजी श्रीगोंदा तालुक्यातील हजारों भाविकांच्या आणि राजकीय, सामजिक व प्रशासकिय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मार्गस्थ झाला. हा सोहळा खरतर ऐतिहासिक सोहळा म्हणुन सर्वांच्या आणि श्रीगोंदा वासियांच्या स्मरणात राहील. शहरातील विवीध भागात हिंदू बांधवांसह मुस्लिम समाजाच्या युवकांनी व पदाधिकाऱ्यांनी पालखी मार्गात पालखी व महंमद महराजांच्या पादुका रथावर पुष्पवृष्टी केली.

आज सकाळी शेख महंमद महाराजांच्या दर्ग्यात सर्व उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते शेरा अर्पण करण्यात आला. तसेच महमंद बाबांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. तर, समतेचे प्रतिक असणाऱ्या सफेद ध्वजाचे पूजन करून ध्वजा रोहन करण्यात आले. शाळकरी विद्यार्थ्यांनी लेझिम पथकाच्या माध्यमांतून कलागुण सादर केले. पालखी मार्गस्थ झाल्यावर ठिकठिकाणी रांगोळ्या आणि पुष्पवृष्ठी करत अभिवादन करून स्वागत करण्यात आले. शहरात चहा आणि फळे वाटण्यात आली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या . शेख महंमद बाबा दर्गहाचे ट्रस्टी आणि वंशज अजिज भाई शेख यांनी नमूद केले की, सदरील सोहळा समतेचा संदेश देणारा सोहळा आहे. यामुळे देशात एक्याचा संदेश जाईल. असे ते म्हणाले..

तर, यात्रा कमिटीचे सदस्य अशोक आळेकर यांनी समितीच्या वतीने प्रतिक्रिया देताना सांगीतले की, हा अभूतपूर्व सोहळा असुन, हा शेख महंमद बाबा यांचा निघणारा पहिला पालखी सोहळा आहे. या निमित्ताने हा ऐक्याचा संदेश सबंध भारतात जाईल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. या सोहळ्यास सर्वधर्मीय समाजाने मोठया प्रमाणावर प्रतिसाद दिला असुन, संतांनी कुठलाही भेदभाव पाळला नाही. याचा प्रत्यय या पालखी सोहळ्यात पाहण्यास मिळाला. असे त्यांनी नमूद केले.

यावेळी शेख महंमद बाबा दर्गाह चे विश्वस्त आणि वशंज राजू शेख, अजिज शेख, सोहेल शेख, बंडूभाई शेख, आमदार बबनराव पाचपुते, राजेन्द्र नागवडे, राहूल जगताप, BRS चे घनःश्याम अण्णा शेलार, बाबासाहेब भोस, तहसीलदार मिलिंद कुलथे, नगराध्यक्षा शुभांगिताई पोटे, प्रताप पाचपुते, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, उप नगराध्यक्षा ज्योती ताई खेडकर, सोनाली ताई घोडके, पोईस माळी, गोपाळ मोटे, बापुशेठ गोरे, सतिश मखरे, सहाजी खेतमाळीस, अशोक खेंडके, नाना कोथंबिरे, पोपट खेतमाळीस, मारूती औटी, संग्राम घोडके सह भावी भक्त, ग्रामस्थ, हजोरोंच्या संख्येने सहभागी होते.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
28.9 ° C
28.9 °
28.9 °
56 %
5.4kmh
100 %
Sat
29 °
Sun
31 °
Mon
31 °
Tue
30 °
Wed
32 °
error: Content is protected !!