लोकक्रांती ऑनलाइन
Panjab Dakh : आरबी समुद्रात झालेल्या चक्रीवादळा मुळे पाऊस आत्तापर्यंत लांबणीवर पडला होता चक्रीवादळ जोपर्यंत स्थिर होत नाही तोपर्यंत वातावरण पूर्ववत होत नाही परंतु आता २२ जूनला चक्रीवादळ स्थिर होणार आहे त्यामुळे २३ जूनपासून मान्सून साठी पोषक हवामान तयार होणार आहे आणि महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज पंजाब डख यांनी व्यक्त केला.
राज्यात कोणत्या भागापासून व कुठे कुठे पावसाला सुरुवात होणार
पंजाब डख यांच्या अंदाजानुसार शुक्रवार पासून पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, नागपूर, यवतमाळ, अकोला तसेच उत्तर महाराष्ट्र जळगाव, घुळे नंदुरबार, नाशिक मुंबई, मराठवाड्या सह बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे. गेल्या वीस दिवसांपासून शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. त्यामुळे लांबणीवर पडलेल्या पावसाला जर आता सुरुवात झाली तर शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा देणारी गोष्ट घडणार आहे. डख यांचा हा अंदाज खरा ठरला आणि पावसाला सुरुवात झाली तर शेतकऱ्यांचा पेरणीचा मार्ग मोकळा होणार आहे.
पाऊस समाधानकारक होणार शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज नाही
पंजाब डख म्हणतात रात्रंदिवस अभ्यास करून हे अंदाज देत असतो त्यामुळे यंदाही चांगला पाऊस पडणार आहे दुष्काळ पडण्याची शक्यता अजिबात नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे चांगला पाऊस होनार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे काही कारण नाही.
कोणत्या तरखेपासून पावसाला सुरुवात होणार
गेली १५ ते २० दिवस महाराष्ट्र मधील शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहत आहे डख यांच्या हवामान अंदाजानुसार येत्या २४ जून पासून २ जुलै पर्यंत बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस पडनार आहे महाराष्ट्र मध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे येत्या सात दिवसांमध्ये समाधानकारक चांगला पाऊस होणार आहे असा नवीन अंदाज पंजाब डख व्यक्त केला आहे.