लोकक्रांती ऑनलाइन
श्रीगोंदा दि.२४ जुन २०२३ : शहरातील रहिवाशी आणि सामजिक क्षेत्रात कार्यरत असणारे दिलीप (नाना) सोनवणे यांची नुकतीच “नॅशनल अँटी करप्शन अँड क्राईम कंट्रोल ब्युरो”च्या अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. त्याबाबतचे नियुक्ती पत्र त्यांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिनांक १८ जुन २०२३ रविवार रोजी सुपूर्त केले. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अस्लम शेख, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ.नाना भोळे, बीड जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण पाटोळे, मराठवाडा अध्यक्ष राणीताई शेख, सचिव सुवर्णा ताई चव्हाण, महिला उपाध्यक्ष बीड उषाताई कांबळे व सुरेखाताई नवले, महिला जिल्हा अध्यक्ष बीड मीरा गुंजाळ सह कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नाना सोनवणे यांचे हितचिंतक व संबधित हजर होते.
श्रीगोंदा शहरात प्रतिकुल परस्थितीत वाटचाल करून, नाना सोनवणे यांनी त्यांच्या कुटुंबासह समाजातील तरुणांना रोजगार निर्मितीसाठी आत्मबळ दिले. भटकी विमुक्त समाजासह त्यांच्या सबंधित असणाऱ्या मागासवर्गीय व इतर समाज घटकातील तरुणांना स्फूर्ती मिळावी म्हणुन, ते कार्यरत राहिले. अनेक युवकांना त्यांनी शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले. मुलगा नितिन सोनवणे आणि भाऊ शहाजी (आप्पा) सोनवणे हे श्रीगोंदा पंचक्रोशीत नामांकित व्यापारी म्हणुन, परिचित आहेत. नितीन सोनवणे हे पट्टीतील पैलवान असुन, आप्पा सोनवणे हे उद्योगपती असल्याबरोबर “नॅशनल अँटी करप्शन अँड क्राईम कंट्रोल ब्युरो”च्या महाराष्ट्र राज्य पदावर कार्यरत आहेत.
दिलीप (नाना) सोनवणे यांची “नॅशनल अँटी करप्शन अँड क्राईम कंट्रोल ब्युरो”च्या अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल रविवारी घेन्यात आलेल्या Astar येथील कार्यक्रमात संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. यावेळी सोनवणे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
जिल्हाध्यक्ष पदी निवड करून “नॅशनल अँटी करप्शन अँड क्राईम कंट्रोल ब्युरो”च्या अहमदनगर जिल्हा कार्यक्षेत्रात कामं करण्याची संधी दिल्याबद्दल दिलिप (नाना) सोनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले. तर, सबंध जिल्ह्यात “नॅशनल अँटी करप्शन अँड क्राईम कंट्रोल ब्युरो”चे काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पाठबळ देत व्याप्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले व नमूद केले की, ब्युरो मार्फत महाराष्ट्र सरकारची मदत करणे स्थानिक पोलीस प्रशासनाला मोलाचे सहकार्य करणे भ्रष्टाचाराला आळा घालणे व महिलांना कायद्याविषयी जनजागृत करणे.. असे या संघटनेचे उद्दिष्ट आहेत.
यावेळी ब्युरोचे महाराष्ट्र राज्य पदाधिकारी उपस्थित होते. तसेच दिलीप नाना सोनवणे यांचे संबंधित, कार्यकर्ते, समाज बांधव, मित्र परिवार आणि कमिटीचे अधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमात “नॅशनल अँटी करप्शन अँड क्राईम कंट्रोल ब्युरोचे राष्ट्रीय अध्यक्ष अस्लम शेख व महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. नाना भोळे सह लक्ष्मण पाटोळे व राज्य सदस्यांनी आपले विचार व्यक्त करून, ब्युरोची ताकद वाढवण्यासाठी सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले व रूपरेषा समजावून सांगितली.