लोकक्रांती ऑनलाइन
श्रीगोंदा दि.२५ जून २०२३ : आयुष्यभर पाषाणाशी संघर्ष करणारी माता स्व मालनबाई धोंडीबा काकडे यांचे स्मरणार्थ अग्नीपंख फौंडेशनने लोणीव्यंकनाथ येथील श्री व्यंकनाथ विद्यालयात बसविलेल्या गुरुजी इलेक्ट्रॉनिक लॅब लोकार्पण आणि स्पर्धा परिक्षेत बाजी मारणाऱ्या शिलेदारांचा लोणीव्यंकनाथ येथे सन्मान करण्यात आला.
हे लोकार्पण व गुणवंत्तांचा सन्मान नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे उद्योजक संजय उंडे यांचे हस्ते करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती सखाराम जगताप होते. यावेळी महेश जंजीरे प्रियंका शिंदे किरण वागस्कर प्रशांत दरेकर प्रताप पवार यांची भाषणे झाली.
यावेळी रामदास झेंडे रावसाहेब काकडे डी आर जिजाबापू शिंदे विलास काकडे उद्योजक लखन नगरे सुनील पाटील शिवदास शिंदे शुभांगी लगड अंकुश घाडगे किसन वऱ्हाडे विठ्ठल वाबळे विजय त्रिंबके बापुसाहेब ढवळे डॉ संतोष ओव्हळ हनुमंत जगताप राहुल गोरखे सुनील धुमाळ उपस्थित होते.
राजेंद्र नागवडे म्हणाले की भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्य प्रेरणेने अग्नीपंख फौंडेशनने शाळा आणि विद्यार्थिसाठी उल्लेखनीय काम चालविले गुणवंतांचा गौरव करुन इतरांना प्रेरणा देण्याचे काम ही काळाची गरज आहे. श्री व्यंकनाथ विद्यालयात इलेक्ट्रॉनिक लॅब सुरु केले हे कौतुकास्पद आहे.
पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले म्हणाले की अग्नीपंख फौंडेशनने विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम राबविले भविष्यात आणखी काम करण्याची गरज आहे.
गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे म्हणाले की श्रीगोंदा तालुक्यातील गुणवत्ता सुधारत आहे भविष्यात निश्चितच चांगले रिझल्ट येतील
प्रास्ताविक प्रा संजय लाकूडझोडे यांनी केले सुत्रसंचालन शिवाजी इथापे यांनी तर आभार प्राचार्य दत्तात्रय सस्ते यांनी केले.