आ.नितेश राणे श्रीगोंदयात हिंदू जण आक्रोश मोर्चात कडाडले.. म्हणाले हिंदू तरुणांनी अत्याचार सहन करायचा नाही..! आता आदेशाची वाट बघू नका..! तुमच्या पाठीमागे मी आहे..!

लोकक्रांती ऑनलाइन
श्रीगोंदा दि. ५ जुलै २०२३ : आज सकाळी श्रीगोंदा बस स्थानका पासून हिंदू जण आक्रोश मोर्चा निघाला होता त्यात हजारो तरुण तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते काष्टी येथे घडलेल्या धर्मांतरन प्रकरणाच्या निमित्ताने मोर्चाचे आयोजन केले होते श्रीगोंदा तहसील आवारात भव्य जनसमुदाय एकवटला होता यावेळी मंचकावर तुकाराम महाराजांचे वंशज ह भ प मोरे महाराज, आमदार नितेश राणे, आमदार बबनराव पाचपुते, खासदार अमर साबळे व आमदार महेश लांडगे हे उपस्थित होते यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना आपली मनोगते व्यक्त केली.

आमदार नितेश राणे यांनी आपल्या बेधडक भाषा शैलीत मनोगत व्यक्त करताना म्हणले की हा मोर्चा कुठल्या एका समाजाच्या विरोधात नाही हिंदू समाजा विरोधात मोठे षड्यंत्र रचले जात आहे त्यासाठी आपण एकत्र जमलो आहोत. हिंदू समाज व धर्मासाठी आपण एकत्र जमलो आहोत. तसेच अनधिकृत कत्तलखाणे बंद झाले पाहिजेत व ते चालावणारांची दहशत सहन केली जाणार नाही. येथून पुढे अत्याचार सहन केले जाणार नाहीत येत्या काही काळात ठराविक घटक हे राष्ट्र मुस्लीम राष्ट्र करायचे प्रयन्त करत आहेत. मुस्लीम समजतील तरुण मुलांना पैसा पुरवून हिंदू मुलींना प्रेमाच्या नावाखाली फसवन्याचे प्रकार घडत आहेत. लव जिहाद सारख्या प्रकरणा मध्ये हॉटेल सारखे विविध जातीतील मुलींचे मेनू कार्ड तयार झाले आहे… सीरिया कायदा लागू करायचा… डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान मानायचे नाही… लव जिहाद… या सर्व गोष्टींकडे गांभीर्याने पहा लव जिहाद हा विषय छोटा समजू नका एखादी मुलगी त्याला बळी पडली असेल तर तिला समजून घ्या आता हिंदू समाज जागा झाला पाहिजे अशा प्रकरणात गप्प बसू नका मुस्लिम समाजातील मुलींसोबत आपल्या समजतील तरुण मुलांचे लग्न लावून द्या घाबरू नका मी तुमच्या मागे आहे असंही राणे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार हिंदुत्ववादी आहे नवीन कोण आले असतील त्यांना हिंदू वादी करू असंही ते म्हणाले. आता महाविकास आघाडी सरकार येणार नाही त्यांना आम्ही संपवून टाकले आहे बाकी उरले सुरले राहिले तेही आमच्या सोबत येतील.

तुकाराम महाराजांचे वंशज ह भ प मोरे महाराज म्हणाले शस्र आणि शास्त्र घरात असले पाहिजे तसेच त्यांनी भारतात जन्म झाल्याचे व हिंदू धर्माबद्दल काही उदाहरणे देऊन उपस्थितांना संबोधित केले.

आमदार महेश लांडगे म्हणाले मोरे महाराज शास्र तुमच्या कडे राहुद्या शस्र आम्ही सांभाळतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन तलाक बंदी केली मुस्लीम समाजातील महिलांना न्याय मिळवून दिला. पुढे बोलताना ते म्हणाले लव जिहाद प्रकरण जर आढळून आले तर आम्ही गप्प बसणार नाही औरंजेबाचा जर उदो उदो केले तर भर चौकात दोन हात करून सजा देण्याची ताकद हिंदू धर्मात आहे कत्तल खाण्यात ज्या गायीचे दूध पिता तिलाच कापता हे बंद झाले पाहिजे.

खासदार अमर साबळे बोलताना म्हणाले ज्या वेळी फाळणी झाली त्यावेळी सर्व मुस्लीमांना पाकिस्तान हा वेगळा भूप्रदेश दिला त्यामुळे आता भारत हे हिंदू राष्ट्र आहे हिंदु बांधवावर ज्या केसेस केल्या आहेत त्या या मोरच्याच्या माध्यमातून माघारी घ्याव्यात असे मी प्रशासनास आवाहन करतो धर्मांतरितर केल्या नंतर मूळ समजतील सवलती मिळाव्यात यासाठी न्यायालयात केसेस चालू आहेत धर्मांतर करणारांनी मूळ सवलती घेऊ नयेत व बाकी समाजावर अन्याय करू नये असी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून साबळे यांनी केली.

आमदार बबनराव पाचपुते यांनी सर्वांचे आभार मानले तसेच श्रीगोंदया मध्ये असे प्रकार घडत नव्हते सर्वजण एकोप्याने राहत होते कष्टीतील घटना दुर्दैवी होती. सर्वांनी समभावणेने एकत्र रहावे व कसलाही अनुचित संभ्रम निर्माण करू नये असंही पाचपुते म्हणाले. श्रीगोंदा तहसीलदार यांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता करण्यात आली. या मोर्चा साठी हाजरो संख्येने तरुण उपस्थित होते तसेच महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
few clouds
33.3 ° C
33.3 °
33.3 °
20 %
4.8kmh
16 %
Thu
33 °
Fri
37 °
Sat
37 °
Sun
37 °
Mon
39 °
error: Content is protected !!