लोकक्रांती ऑनलाइन
दि. ६ जुलै २०२३ : सध्या महाराष्ट्रात पावसाला चांगली सुरुवात झाली आहे व ठीक ठिकाणी चांगला पाऊस पडत आहे दिनांक ६ जुलै पासून ८ जुलै पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार व त्यानंतर १३ जुलै ते १७ जुलै राज्यात परत एकदा मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे. जुलै महिन्यात दरवर्षी पाऊस नसतो परंतु या वर्षी भरपूर पाऊस पडणार व सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या होणार असल्याचे पंजाब डख यांनी मत व्यक्त केले.
मोठे पाऊस जून मध्ये न पडता जुलै महिन्यात पडण्याचे कारण
आरबी समुद्रात झालेल्या चक्रीवादळामुळे मान्सूनचे बाष्प दुसरीकडे खेचले गेले व राज्यात मान्सून येण्यास विलंब झाला त्यामुळे जूनमध्ये महिन्याच्या शेवटी पावसाला सुरुवात झाली त्यामुळे आता जुलै महिन्यामध्ये मोठे पाऊस होत आहेत संपूर्ण जुलै महिन्यामध्ये दररोज ठीक ठिकाणी पाऊस होणार असल्याचा अंदाज डख यांनी वर्तवला आहे.
जुलै नंतर पुढील महिन्यात पाऊस पडणार का?
पंजाब डख यांच्या हवामान अंदाजानुसार जून पेक्षा जुलैमध्ये पाऊस जास्त पडणार असं त्यांनी सांगितलं होते आणि त्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये ही पाऊस चांगल्या प्रमाणात होणार आहे असेही त्यांनी मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे पंजाब डख यांच्या अंदाजानुसार त्यांनी म्हटले आहे की शेतकऱ्यांनी आता पावसाची चिंता करू नये पावसाचे प्रमाण चांगले राहणार आहे.
मागील काही दिवसांत पंजाब डख यांचे अंदाज खरे ठरले..!
पंजाब डख यांनी सांगितलं होत की २५ जूननंतर पाऊस येणार आहे असं सांगितल्याच्या नंतर २५, २६ व २७ जूननंतर बऱ्याच ठिकाणी विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस झाला आणि या पावसामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या पेरण्या देखील झाल्या आहेत आणि आत्ताच त्यांनी मागचा एक अंदाज दिला होता त्यामध्ये सांगितलं होत की ३ जुलैपासून ते १० जुलैपर्यंत राज्यात दररोज वेगवेगळया भागात पाऊस पडणार आहे. त्यानुसार पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाड्यामध्ये आणि राज्यातील विविध ठिकाणी पाऊस पडला व त्यानुसार पावसाला चांगली सुरुवात देखील झाली आहे. आणि सर्वांच्या पेरण्या होणार आहेत असाही एक अंदाज दिला होता. त्यामुळे पंजाब डख यांचे आतापर्यंतचे अंदाज खरे ठरताना दिसत आहेत.