लोकक्रांती ऑनलाइन
श्रीगोंदा दि.११ जुलै २०२३ : सोमवार दिनांक १० जुलै २०२३ रोजी श्रीगोंदा पंचायत समिती समोर उपोषणकर्ते शुभम राजेंद्र मोटे यांनी विविध कामांच्या देयकांसाठी उपोषण केले. ग्रामपंचायत उक्कडगाव येथील १५ वा वित्त आयोगातंर्गत तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेअंतर्गत केलेल्या कामांचे देयके भरपूर दिवसापासून प्रलंबित होती तरी या देयकांसाठी खूप वेळा मागणी करूनही देयक देण्यास ग्रामसेवक टाळाटाळ करत होते त्यामुळे पंचायत समिती समोर उपोषण करण्याची वेळ आली असल्याचे शुभम मोटे यांनी सांगीतले.
यावेळी सदरील उपोषणास महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ आणि राज्य अभियंता संघटना यांनी जाहीर पाठिंबा देऊन महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ राज्याध्यक्ष इंजि. मिलिंद भोसले आणि जिल्हाध्यक्ष इंजि.समीर शेख तसेच तालुका अध्यक्ष गणेश श्रीराम यांनी गट विकास अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करून उपोषणकर्त्याचे देयक देण्यास भाग पाडले.
महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ आणि राज्य अभियंता संघटना यांच्या एकजुटीमुळे बाकी राहिलेले देयक मिळाले तरी बाकी कंत्राटदारांना शुभम मोटे यांनी संघटनेसोबत एकजुटीने काम करावे अशे उपोषण सोडल्या नंतर नमूद केले.
महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ श्रीगोंदा तालुका संघटनेकडून काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा..!
श्रीगोंदा पंचायत समितीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ चालू आहे याबाबत गटविकास अधिकारी यांना विचारणा केली असता त्यांनी ते आम्ही पाहून घेऊ अशी अरेरावीची भाषा वापरली तरी त्यांना महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ आणि राज्य अभियंता संघटनेच्या वतीने सध्याच्या परिस्थितीत सुधारणा न झाल्यास येत्या १५ दिवसात काम बंद आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ श्रीगोंदा तालुका अध्यक्ष इंजि. गणेश श्रीराम यांनी दिला आहे.