लोकक्रांती ऑनलाइन
श्रीगोंदा दि.१८ जुलै २०२३ : श्रीगोंदा तालुका मेडिकल असोसिएशन च्या वतीने रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त दि.७ जुलै रोजी हॉटेल ए स्टार श्रीगोंदा येथे आयोजित कार्यशाळा प्रमुख डॉक्टरांच्या उपस्थितीत पार पडली या कार्यशाळेला “बदलते वातावरण व आरोग्य” या विषयावर , पद्मश्री पोपटराव पवार यांनी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन केले. यावेळी सध्याचे पाण्यातील, आहारातील, वातावरणातील व जागतिक तापमानातील बदल, मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम करत असल्याचे त्यांनी सांगितले तसेच श्रीगोंद्यातील डॉक्टरांना आरोग्याविषयी एक गाव दत्तक घेण्याचे आवाहन देखील केले.
यावेळी पोपटराव पवार यांच्या हस्ते, असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक खेंडकें पासून, सध्याचे अध्यक्ष डॉ. संतोष काकडे यांच्यापर्यंत सर्व माजी अध्यक्षांचा, त्यांनी त्यांच्या अध्यक्षीय कालावधीत, इतर सर्व वैद्यकीय व्यवसायिकांसाठी जे विविध वैयक्तिक व सामाजिक उपक्रम राबविले, तसेच संघटनेस एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी यांनी दिलेल्या योगदानबद्दल एक कृतज्ञता म्हणून स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात डॉ. क्षितिजा व डॉ. सिद्धार्थ कुलकर्णी योगेश्वरी हॉस्पिटल दौंड यांच्या “यकृत वाचवा, माती वाचवा/ सेव्ह लीव्हर, सेव्ह सॉइल” उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी डॉ. विजय मैड , डॉ. बाळासाहेब खेंडके यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. राजेंद्र पाचपुते, डॉ. उमेश हांडे, डॉ. विकास सोमवंशी, डॉ. गोविंद भोईटे, डॉ. वैभव मचे, डॉ . रेखा कांडेकर, डॉ. संतोष मोटे, डॉ सचिन जाधव , डॉ. सागर ताकपेरे, डॉ अरुण ढवळे , डॉ शंकर भोसले यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी डॉ. लाड, डॉ. संजीव कथुरिया, डॉ. अनिल मोरे, डॉ. बेहरे, डॉ.भालचंद्र गुणवरे, डॉ. जांभळे, डॉ. किशोर मचाले, डॉ. आनंद काकडे , डॉ. मजहर सय्यद, डॉ. अनुप बगाडे, डॉ चंद्रशेखर कळमकर व इतर सर्व असोसिएशन चे मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अनिल शिंदे होते. सूत्रसंचालन डॉ. विश्वास भापकर व आभार प्रदर्शन डॉ. शुभांगी जाधव यांनी केले.