लोकक्रांती ऑनलाइन
श्रीगोंदा दि.१९ जुलै २०२३ : या प्रकरणी फिर्यादी सौ. रुपाली अंकुश मोरे वय ४० वर्ष, धंदा- शेती, रा. एरंडोली, ता. श्रीगोंदा यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादित नमूद केले आहे की, लहान मुलगा समाधान अंकुश मोरे हा मढेवढगाव येथील दिलीप मांडे यांचेकडे नोव्हेंबर २०२२ ते मे २०२३ दरम्यान ट्रॅक्टर चालक म्हणुन कामास होता. या कालावधीमध्ये समाधान हा दिलीप मांडे यांचे ट्रॅक्टर वर चालक म्हणुन काम करत असताना त्यांचा किरकोळ कारण तसेच ट्रॅक्टर चालक व्यतिरिक्त इतर काम दिलीप मांडे तसेच प्रविण मांडे हे त्याला सांगत असल्याने समाधान व त्यांचेमध्ये वाद होत होते. त्याबाबत समाधान मला वेळोवेळी सांगत असे. मे २०२३ मध्ये समाधान याने दिलीप मांडे यांचे सोबत होत असलेल्या वादामुळे त्यांचे ट्रॅक्टर वरील काम सोडुन तो घरीच शेती करत असे.
त्यानंतर साधारण ८ ते १० दिवसापुर्वी दिलीप मांडे हे समाधान यांस टॅक्टर ट्रॉलीचे काम करायचे आहे असे सांगुन घेवुन गेले होते. परंतु, त्यांचेमध्ये व समाधान मध्ये वाद झाल्याने समाधान काही काम न करता परत आला होता. तेव्हा त्याने दिलीप मांडे व त्याचे घरातील लोकासोबत वाद झालेला असल्यामुळे मी काम न करता परत आलो आहे असे सांगितले.
त्यांनी पुढे फिर्यादीत म्हटले की, दिनांक १४ जुलै २०२३ रोजी रात्री ०७:३० वाजणेचे सुमारास मी व माझा मुलगा संतोष व समाधान असे घरी असताना दिलीप गणपत मांडे रा. मढेवडगाव ता. श्रीगोंदा हा व त्यांचे सोबत पाडुरंग उंडे हा पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो गाडी नं MH-16- AT 1545 घेवुन आमचे घरी आले. घरी आल्यानंतर दिलीप मांडे हा मला म्हणाला की, माझे ट्रॅक्टरला ड्रायव्हर नसल्यामुळे उभा आहे. तसेच, मला ट्रॉली दुरुस्त करायची आहे. तेव्हा तुमचा मुलगा समाधान यास माझे सोबत ड्रायव्हर म्हणुन, पाठवा! त्यावेळी समाधान हा दिलीप मांडे यांचेसोबत होत असलेले वादामुळे त्यांचे सोबत कामावर जाण्यास नकार देवु लागला. त्यावेळी दिलीप मांडे हा वारंवार विनवणी करु लागल्याने संतोष हा समाधान यास तु एक दिवस कामावर जा मी उदया तुला घेण्यासाठी येतो. असे सांगितलेने समाधान हा दिलीप मांडे यांचेसोबत बोलोरो गाडीत बसुन गेला.
दि.१५ जुलै २०२३ रोजी सकाळी ०६:०० वाजता फिर्यादीचा मोठा मुलगा संतोष यास दिलीप मांडे याचा फोन आला व तु लवकर मढेवडगावला ये तुझ्याकडे काम आहे असे सांगितले. त्यानंतर संतोष हा मोटार सायकलवर मढेवडगाव येथे गेला. १०:३० वा चे सुमारास मोठी जाऊ रेखा अशोक मोरे यांनी सांगितले की, दिर रामदास आबा मोरे यांनी मला फोन करून सांगीतले की, समाधान याने मढेवडगाव येथे मांडे यांचे घरी फाशी घेतलेली आहे.
त्यानंतर मुलाचे प्रेत हे ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा येथे आणले होते. मुलाचे प्रेतावर पोस्ट मॉर्टम केले तेव्हा मुलाचा खुन झाला आहे म्हणुन मी माझे मुलाचे परत पोस्ट मॉर्टम करावे याबाबत तक्रारी अर्ज दिला. तेव्हा मुलाचे प्रेताचे पोस्ट मॉर्टम हे पुन्हा ससुन हॉस्पीटल पुणे येथे करण्यात आले. तेव्हा तेथील वैदयकीय अधिकारी यांनी समाधानला छाती व डोक्याला मारहाण झाली असल्यामुळे तो मयत झाला आहे. म्हणुन, फिर्यादी ने दिलीप मांडे, पाडुरंग उंडे व प्रविण मांडे रा. मढेवडगाव यांचे बरोबर यापुर्वी झालेले वादामुळे त्यांनी समाधान अंकुश मोरे यांस मारहाण करुन त्याचा खुन करुन त्यांस फाशी देडुन झाडाला लटकवला असल्याची तक्रार केली. त्यानूसार १) दिलीप गणपत मांडे २) पाडुंरंग उंडे ३ ) प्रविण दिलीप मांडे ४) अभि दिलीप मांडे ५) बाळासाहेब मांडे ६) अक्षय त्रंबक मांडे ७) आकाश बाळासाहेब मांडे सर्व रा. मढेवडगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर यांचेविरुध्द भादवी कलम ३०२ व ३४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या खून प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे व बाकी आरोपींचा शोध सुरू आहे.