लोकक्रांती ऑनलाइन
श्रीगोंदा, दि.२४ जुलै २०२३ : श्रीगोंदा येथे मणिपुर घटनेचा सर्वपक्षीय निषेध करण्यात आला यावेळी बोलताना डॉ. प्रणोती जगताप यांनी सांगितले की मणिपूर मधील परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडत चालली आहे, मणिपूर मध्ये कुकी समाजातील दोन महिलांची नग्न अवस्थेत धिंड काढून त्यांची हत्या करण्यात आली आहे, हा संघर्ष मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू आहे जवळपास तीन महिन्याचा कालावधी झाला असूनही केंद्र सरकार तेथील परिस्थितीवर नियंत्रण मिळू शकला नाही आहे, आत्तापर्यंत १४० लोकांनी आपला जीव गमावला आहे.
मनिपुर मधील दोन महिलांवरील अत्याचाराची घटना खूप संवेदनशील आणि विचलित करणारी आहे, परंतु देशाचे पंतप्रधान आणि विश्वगुरू नरेंद्र मोदी आणि महिला बालकल्याण मंत्री स्मृती ईराणी यांनी अजूनही मणिपूर बाबत आपल्या तोंडातून एकही शब्द काढलेला नाही, मणिपूरचे मुख्यमंत्री यांनी अजूनही कुठलीही ठोस कार्यवाही केलेली नाही त्यामुळे तेथील जनता घाबरलेली आहे.
महिलांवरील वाढलेल्या अत्याचारावर बीजेपी सरकार कधीच कोणते न्यायपूर्वक स्टेटमेंट करीत नाही आणि बीजेपी कधीही या महिलांना न्याय मिळवण्यासाठी पुढे येत नाही, मणिपूर मध्ये भाजपाचे सरकार असून सुद्धा महिला असुरक्षित आहेत, सनातन धर्माचा बुरखा ओढणारा बीजेपी, महिलांना का न्याय मिळवून देत नाही? सनातन धर्मामध्ये या पद्धतीची शिकवण दिलेली आहे का असा प्रश्न बीजेपी सरकारला डॉ. प्रणोती जगताप यांनी केला?
केंद्र सरकारने लवकरच मनिपूरची परिस्थीती नियंत्रणात आणावी आणि तेथील जनतेला भयापासून मुक्तता द्यावी तसेच महिलांवरील अत्याचारांची तात्काळ चौकशी करून फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवून दोषींना कडक शिक्षा करावी अशी मागणी BRS चे नेते टिळक भोस यांनी केली.
यावेळी शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, भाऊसाहेब खेतमाळीस, मुकुंद सोनटक्के, सतीश बोरुडे, राजू लोखंडे, संदीप उमप, ऋषिकेश गायकवाड़, राजू गोरे, आशा ढगे, साबळे मॅडम, स्नेहा मोटे, शिवानी कापसे, रोहिणी जगताप, प्रतिभा उंडे, पांडुरंग पोटे तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.