लोकक्रांती ऑनलाइन
श्रीगोंदा दि.३० जुलै २०२३ : श्रीगोंद्यातील सुफी संत शेख महंमद बाबा दर्गाह मध्ये पारंपारिक पद्धतीनुसार ताबुत (ताजीया ) ची दि. २० जुलै २०२३ रोजी स्थापना करण्यात आली होती. तसेच श्रीगोंदा शहरात जावेद फकीर, राजु मनियार, झुंबरराव गोरे, बादशहा मालजप्ते, महंमद शेख, डॉ. बन्सीभाई मनियार आदिंसह श्रीगोंदा तालुक्यात अनेक ठिकाणी ताजिया व सवारी, पंजाची स्थापना करण्यात आली होती.
शेख महमद बाबा दर्गाह येथे स्थापन केलेल्या ताबुत (ताजीया) ची शनिवार दि. २९ रोजी शेख महंमद बाबा यांचे वंशज शेख महंमद बाबा दर्गाह ट्रस्ट चे अध्यक्ष व दैनिक सिटीझनचे संपादक आमीनभाई शेख, बंडूभाई शेख, अल्ली शेख, अजिज शेख, राजू शेख, चाँद शेख, फारुख शेख, सोहेल शेख, तौसीब शेख, रेहान शेख,शारुख शेख, शाहीद शेख, फरहान शेख यांच्या हस्ते विधीवत धार्मीक पुजा करुन भावीक- भक्तांच्या उपस्थितीत वाद्य मिरवणुकीने श्रीगोंदा शहरातील पंचायत समिती वसाहतीतील विहीरीत सायंकाळी ताबुतचे विर्सजन करण्यात आले.
यावेळी पो.नि.ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. गोरे, पो.कॉ. खारतोडे, संतोष जगताप यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.