लोकक्रांती ऑनलाइन
श्रीगोंदा दि. १ ऑगस्ट २०२३ : श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथे अनेक वर्षांपासून एसटी स्टँड ते मराठी शाळा हा गावाच्या मुख्य रहदारीचा रस्ता खराब झालेला आहे. रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण झालेले आहे.जड वाहतुकीने रस्ता पूर्णपणे खचलेला आहे.वेळोवेळी ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देऊन देखील रस्ता दुरुस्त झाला नाही. आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने रस्ता रोको करून खड्यात वृक्षारोपण करून गांधीगिरी मार्गाने आंदोलन करण्यात आले.
एकीकडे देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना मांडवगण मध्ये जिथं देशातील तरुण पिढी घडवली जाते त्या शाळेला जायला लहान मुलांना रस्ता नाही. खड्यानी गुडघाभर साचलेल्या पाण्यातून मुलांना अन नागरिकांना ये जा करावी लागत आहे.या खड्यानी पावसाळ्यात घसरून पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या आंदोलनाने याकडे आज प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
यावेळी संभाजी ब्रिगेडच्या वतीने सा. बां. चे अधिकारी एस. बी. निमसे, ग्रामविकास अधिकारी ए. आर. राऊत यांना निवेदन देण्यात आले. निमसे यांनी एक महिन्यात सर्व अतिक्रमण हटवून काँक्रीट रस्ता चे टेंडर काढून महिना भरात रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन यावेळी दिले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घोडके, कण्हेरकर मेजर यांनी नागरिकांच्या जन भावना तीव्र असून प्रशासनाने रस्त्या लवकरात लवकर दुरुस्त करून आणि रस्त्याचे काम दर्जेदार करून नागरिकांची होणारी गैरसोय बंद करावी असे सांगितले.
महिनाभरात रस्त्याचे काँक्रीट काम सुरू न झाल्यास सा. बां. अधिकारी अन ग्रामपंचायात मधील सत्ताधारी आणि विरोधक याना रस्त्यात पडलेल्या खड्यानी बसविण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संग्राम देशमुख यांनी दिला आहे.यावेळी राजेंद्र घोडके,विनोद देशमुख,कण्हेरकर मेजर,डॉ.लखन लोखंडे,योगेश देशमुख,जगदीश शिंदे,नितीन भोसले,भाऊ बोरुडे,यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.