लोकक्रांती Online
श्रीगोंदा दि.८ सप्टेंबर २०२३ :
आज दिनांक ०८ सप्टेंबर २०२३ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, अहमदनगर येथे गुन्हे परिषदे दरम्यान कर्जत उपविभाग जिल्हा अहमदनगर मधे उत्कृष्ट कामगिरी करणारे प्रभारी पोलीस अधिकारी म्हणून पोलीस महानिरीक्षक बी.जे.शेखर यांचे हस्ते गौरव करण्यात आला.
तसेच १ मार्च २०२३ ते ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत आपल्या पोलीस स्टेशन कडील मालमत्तेविरुद्ध ६१ गुन्ह्यांपैकी ३१ गुन्हे उघडकीस व ६८ आरोपी अटक करून गुन्हयातील चोरीस गेलेला १३,५६,०००/- रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला तसेच मागच्या वर्षीच्या तुलनेत ६७ गुन्हे कमी दाखल झाले या कामगिरी मुळे पोलीस महानिरीक्षक बी.जे.शेखर यांचे हस्ते, माननिय पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे , उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांचे प्रमुख उपस्थितीत बेलवंडी पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे संघ भावनेचे कौतुक करून उत्कृष्ट प्रभारी अधिकारी म्हणून गौरव करून पुढील कार्यवाही करिता त्यांना शुभेच्छा दिल्या.