शेतकरी बांधवांना महत्वाची सूचना..! महाराष्ट्र शासनाकडील निर्देशानुसार पीक पेराची नोंद ई-पीक पाहणी ॲप द्वारे करावी तरच पीक विमा अनुदानास पात्र ठरणार..!

लोकक्रांती Online
श्रीगोंदा दि.९ सप्टेंबर २०२३
श्रीगोंदा तालुक्यात एकुण ११५ गावे असुन महाराष्ट्र शासनाकडील निर्देशानुसार सर्व शेतकरी बांधवांनी स्वतःचे शेतामध्ये जाऊन स्वत: ई-पीक पाहणी व्हर्जन 2.0.11″या ॲप दवारे पिकाची नोंदणी करणे आवश्यक आहे.

सध्या पाऊस नसल्यामुळे उदभवलेली नैसर्गीक मोसमी अनियमीततेची परिस्थती पाहता सध्या किंवा भविष्यात शासनाकडुन पिक विमा योजना, नैसर्गिक आपत्तीचे सानुग्रह अनुदान जाहीर केलेस ते वाटप करणेसाठी सर्व शेतकरी बांधवांचे पीक पेराची नोंद ‘ई’ पीक पाहणी ॲप द्वारे न केलेस
शासनाकडील अनुदान बाधित शेतकरी यांना मिळणार नाही.

तरी तालुका प्रशासनाकडून जाहीर आवाहन करणेत येते आहे की, सर्व शेतकरी बंधुनी आपआपल्या शेतातील पीक पेराची नोंद तात्काळ ‘ई-पीक पाहणी” ॲप वरुन करणेत यावी. या कामी अडचणी उदभवलेस संबंधित गावचे तलाठी, कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी (महसुल), तालुका कृषी अधिकारी व तहसिल कार्यालय श्रीगोंदा यांचेशी संपर्क साधावा.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
25.1 ° C
25.1 °
25.1 °
78 %
6.4kmh
100 %
Sun
34 °
Mon
34 °
Tue
32 °
Wed
33 °
Thu
34 °
error: Content is protected !!