खरीप हंगाम जून २०२२ च्या नुकसान भरपाई मिळण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे तहसीलदार यांना निवेदन..!

लोकक्रांती Online
श्रीगोंदा दि.९ सप्टेंबर २०२३ :
खरीप हंगाम जून २०२२ च्या नुकसान भरपाई मिळण्यासाठी संभाजी ब्रिगेड कडून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. गेल्या वर्षीच्या खरीप हंगाम जून २०२२ मध्ये श्रीगोंदा तालुक्यात मांडवगण गटासह,बेलवंडी, कोळगाव आणि अन्य इतर गटात शेतकऱ्यानी खरीप पिकांची पेर केलेली होती.सर्व पिके व्यवस्थित आलेली होती.परंतु सततच्या पावसाने शेतकऱ्यांचा हाताशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला.शेतकऱ्यांनी इकडून तिकडून पै पै जमवून बी-बियाणे खते भरणा केला होता.ऐनवेळी पिके हातात येण्याच्या वेळेस शेतकऱ्यांचे सततच्या पावसाने प्रचंड आर्थिक नुकसान झाले.

शेतीत पिकांच्यासाठी केलेला सर्व खर्च वाया गेला.त्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडलेला असताना अजून वर्ष उलडून देखील शेतकऱ्यांना सरकारकडून कुठलीही आर्थिक मदत झालेली नाही.तरी तहसीलदार यांनी शेतकर्यांना मदत मिळविण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून शेतकऱ्याना झालेल्या नुकसानीची आर्थिक मदत लवकरात लवकर मिळून द्यावी.

अन्यथा शासन दरबारी संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा संभाजी ब्रिगेडचे शेतकरी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संग्राम देशमुख यांनी निवेदना द्वारे दिला आहे.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
light rain
25.5 ° C
25.5 °
25.5 °
76 %
6.1kmh
100 %
Sat
24 °
Sun
22 °
Mon
23 °
Tue
27 °
Wed
28 °
error: Content is protected !!