कोपर्डी प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र (पप्पू) शिंदे याची येरवडा कारागृहात आत्महत्या..!

लोकक्रांती Online
पुणे : दि.१० सप्टेंबर २०२३ :
अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील कोपर्डी बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र (पप्पू) शिंदे याने पुण्यातील येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आज पहाटेच्या सुमारास पोलीस गस्तीसाठी गेले असताना हा आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती समजताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दरम्यान १३ जुलै २०१६ च्या संध्याकाळी अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी इथल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणातील तीनही आरोपींना २९ नोव्हेंबर २०१७ ला अहमदनगरच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवले होते. यासाठी एका विशेष फास्ट – ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्यात आली होती.

अवघ्या महाराष्ट्राला हादरावून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र (पप्पू) शिंदे हा येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. आज सकाळी पहाटेच्या सुमारास येरवडा कारागृहात बराकमध्ये त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कारागृहात पोलीस गस्तीवर गेले असताना जितेंद्र(पप्पू) शिंदेचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळतात वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
30 ° C
30 °
30 °
53 %
2.5kmh
100 %
Fri
30 °
Sat
25 °
Sun
30 °
Mon
28 °
Tue
28 °
error: Content is protected !!