लोकक्रांती Online
श्रीगोंदा, दि.२२ सप्टेंबर २०२३ :
महिलांच्या विविध प्रश्नांसाठी झगडणार्या शेडगाव येथील सुप्रिया आव्हान काळे यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली या निवडीचे पत्र प्रहार संघटनेचे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष सुरेश सुपेकर यांनी आज दिले.
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आमदार बच्चुभाऊ कडू हे प्रहारच्या माध्यमातून सर्व क्षेत्रातील क्षेत्रातील जाती धर्मातील सर्व समाजाला न्याय देण्याचे काम करतात तसेच शेतकऱ्यांना असणाऱ्या अडीअडचणी समजावून घेऊन शासनाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करतात प्रहार संघटनेचे माध्यमातून सर्व जाती धर्माला न्याय देण्याचे काम करत आहे .
म्हणूनच प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष सुरेश सुपेकर यांनी आदिवासी समाजातील श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील सुप्रिया आव्हाने काळे यांना महिलाला संघटनेत काम करण्याची संधी दिली त्यांचा कामाचा लेखाजोखा पाहून त्यांना महिला आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र आज देण्यात आले.
यावेळी भाग्यश्री काळे, अनिता चव्हाण, धनश्री भोसले, वैशाली भोसले, ज्वाला पवार, सपना काळे, सगुना काळे, आव्हान काळे, दीपक काळे, जवान काळे, बाजीगर पवार, अभिषेक पवार, शुभम पवार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.