लोकक्रांती Online
श्रीगोंदा, दि.२६ सप्टेंबर २०२३ :
श्रीगोंदा तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय आढळगाव येथे पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३६ वी जयंती सोहळा मंगळवार दि.२६ रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आला होता. मान्यवरांच्या उपस्थितीत कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली.
जयंती निमित्त विद्यालयात संस्कृतीक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व प्रतिमेची गावात मिरवणूक काढण्यात आली . शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम, नृत्य, घोषणा व वाद्य अतिशय सुंदर वाजवत कार्यक्रमाची शोभा वाढवली मिरवणूक झाल्यानंतर विद्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेब भोस (जनरल बोडी सदस्य र.शि. सातारा) होते प्रमुख पाहुणे हेमंत ढोकले साहेब (अप्पर तहसीलदार श्रीगोंदा), आमदार बबनरावजी पाचपुते साहेब (माजी मंत्री महा. राज्य), राहुल दादा जगताप (माजी आमदार), सुभाषलाल गांधी (जनरल बोडी सदस्य), कुंडलिकराव दरेकर (ज. सदस्य), तुकाराम कान्हेकर (वि. अधिकारी उ. अ.नगर प्र.शि.स. सातारा), बाजीराव कोरडे (ज.बॉडी स), शरदभाऊ जमदाडे (बाजारसमिती संचालक ), आढळगाव सरपंच शिवप्रसाद उबाळे, उप सरपंच, ग्रा. सदस्य, ग्रामस्थ या कार्यक्रमास उपस्तीत होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे बी.बी. काळे सर यांनी केले शाळेचे प्राचार्य साळुंके सर यांनी विद्यालयाच्या वतीने आभार मानले.