लोकक्रांती Online
श्रीगोंदा, दि.२९ ऑक्टोबर २०२३ :
सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३ -२४ या ४९ व्या गळीत हंगामाचा गव्हाण पूजन व गाळप हंगाम शुभारंभ राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री हर्षवर्धन पाटील, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले व व्हाईस चेअरमन अॅड. माधवराव कानवडे यांचे शुभहस्ते आणि कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांचे अध्यक्षतेखाली बुधवार दि. १ नोव्हेंबर रोजी दुपारी २-३० वाजता आयोजित केला असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी दिली.
भोस यांनी पुढे सांगितले की, या कार्यक्रमास तालुक्याचे आमदार व माजी मंत्री बबनराव पाचपुते, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ. अनुराधाताई नागवडे, श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. शुभांगीताई पोटे यांच्या बरोबरच तालुक्यातील विविध पदाधिकारी, आजी-माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य , कारखाना, दूध संघ, मार्केट कमिटी, खरेदी विक्री संघ तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, आजी-माजी संचालक, सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक , आजी-माजी नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सदर प्रसंगी गव्हाणीची विधिवत पूजा कारखान्याचे संचालक लक्ष्मणराव बाबुराव रायकर व त्यांच्या पत्नी सौ. रखमाबाई लक्ष्मण रायकर, अनिल देवराम पाचपुते व त्यांच्या पत्नी सौ. सुजाता अनिल पाचपुते, बंडू अण्णासाहेब पंधरकर व त्यांच्या पत्नी सौ. निर्मला बंडू पंधरकर, भाऊसाहेब बाबा बरकडे व त्यांच्या पत्नी सौ. भागुबाई भाऊसाहेब बरकडे यांचे शुभहस्ते करण्यात येणार असून काटा पूजन कारखान्याचे सभासद बबनराव शंकरराव पिंपळे व त्यांच्या पत्नी सौ. सुनंदा बबनराव पिंपळे यांचे शुभहस्ते आयोजित करण्यात आलेली आहे.
या कार्यक्रमास सर्व सभासद बंधू भगिनींना, ऊस उत्पादक शेतकरी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस व संचालक मंडळ सदस्य यांनी केले आहे.