लोकक्रांती Online
श्रीगोंदा, दि.१५ नोव्हेंबर २०२३ :
बलिप्रतिपदा निमित्त मंगळवार दि.१४ रोजी संभाजी ब्रिगेड श्रीगोंदा यांच्यावतीने महासम्राट बळीराजा यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी जोधपूर मारुती चौक येथे दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. लोककल्याणकारी, संविभागी, समताधिष्ठित, ज्ञायी राजा म्हूणून ओळख असणाऱ्या अशा राजाची आठवण म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला होता.
ईडा पीडा टळो बळीचे राज्य येवो असं म्हणून आजही प्रत्येक घरात आठवण काढली जाते म्हणूनच संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज एक दिवा बळीराजासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष शाम जरे आणि जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे यांनी बळीराजा विषयी मनोगत व्यक्त करत उपस्थितांना माहिती दिली.
या कार्यक्रमाला अरविंद कापसे, शाम जरे, नाना शिंदे ,विनोद मेहेत्रे,विजय वाघमारे,सागर हिरडे,जितेंद्र पाटोळे,सागर जाधव, प्रशांत गदादे,बाप्पू चव्हाण,राजेन्द्र गाडेकर,कोरडे सर,जासूद सर,सागर खोमणे ,जावळे सर आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.