दुधाच्या बाजारभावासाठी श्रीगोंदा येथे दोन तास रस्ता रोको..!

मागण्या मान्य न झाल्यास श्रीगोंदा तालुक्यातुन एकही दुधाचा टॅकर तालुक्याबाहेर जाऊ देणार नाही - दूध उत्पादक संघर्ष समितीअध्यक्ष सोनू कोथिंबीरे

लोकक्रांती
श्रीगोंदा, दि.२० नोव्हेंबर २०२३ :
श्रीगोंदा तालुका व श्रीगोंदा शहर दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने श्रीगोंदा शहरामध्ये दि.१९ रोजी महात्मा फुले सर्कल या ठिकाणी दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या मिनरल वॉटरची बॉटल वीस रुपयाला मिळत असताना दुधाचा १ लिटरचा बाजारभाव हा २५ रुपये आहे एकंदरीत दूध उत्पादनाचा खर्च पाहता आज शेतकऱ्यांच्या हातामध्ये काहीच शिल्लक राहत नाही आज प्रत्येक व्यापाराला त्याच्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार त्याला आहे परंतु दुर्दैवाने शेतकऱ्याने उत्पादित केलेल्या त्याच्या कुठल्याही मालाचा भाव हा त्याला ठरवता येत नाही खऱ्या अर्थाने ही खूप मोठी शोकांतिका आहे

याच उद्धेशाने दूध उत्पादक संघर्ष समितीचे अध्यक्ष सोनू कोथिंबीरे,अरविंद कापसे, कालिदास कोथिंबीरे, संदीप कोथिंबीरे, सागर रसाळ या सर्वांनी गेल्या आठवड्यामध्ये रस्ता रोकोचे निवेदन तहसीलकार्यालय व पोलीस स्टेशनला दिले होते आणि त्याचाच एक भाग म्हणून आज सरस्वती नदीच्या पुलावरती महात्मा फुले सर्कल या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आले

या वेळी बोलताना दुध उत्पादक संघर्ष समिति चे अध्यक्ष सोनू कोथिंबीरे यांनी मागण्या मान्य न झाल्यास श्रीगोंदा तालुक्यातुन एकही दुधाचा टॅकर तालुक्याबाहेर जाऊ देणार नाही आणि आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा सरकारला दिला.

यावेळी बीआरएसचे राज्याचे नेते घनश्याम शेलार, टिळक भोस,भारतीय जनता पार्टीचे राजेंद्र म्हस्के, माजी नगराध्यक्ष एमडी शिंदे, उपनगराध्यक्ष सुधीर खेडकर नगरसेवक संतोष कोथिंबीरे,प्रशांत गोरे,सतीश मखरे,प्रदीप लोखंडे, मंगेश मोटे, सागर रसाळ,अवधुत जाधव,राहुल वडवकर,दिलीप लबडे,नानासाहेब शिंदे, गोरख आळेकर,बंटी बोरुडे,विनोद होले, समीर कोथिंबीरे आदी मान्यवर व बरेच शेतकरी बांधव उपस्थित होते

  • पालकमंत्री तथा दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे साहेब यांनी दुधाला ३४ रुपये हमीभाव जाहीर केला असला तरी तो मिळत नाही त्याबद्दल पालकमंत्री विखे साहेब यांनी दूध दरामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी – घनश्यामआण्णा शेलार (बीआरस नेते)

    मध्यंतरीचे काळात दूध भेसळीच्या संदर्भात अन्न व औषध प्रशासनाने जी कारवाई केली त्या कारवाईमध्ये सातत्य ठेवावे अन्यथा अन्न व औषध प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल – टिळकजी भोस (बीआरएस नेते)

  • शेतकऱ्यांच्या दूध, तूर,कापूस या मालाला राज्य सरकारकडून व्यवस्थित बाजारभाव न मिळाल्यास ३० तारखेच्या नंतर सर्व शेतकऱ्यांना बरोबर घेऊन साखळी उपोषण करणार – राजेंद्र मस्के (भाजपा नेते)

पुढील आठवड्यात दुधदरासंधर्भात व सर्वच शेतमालाला योग्य बाजारभाव मिळावा यासाठी मुख्यमंत्री मा,एकनाथजी शिंदेसाहेब यांची सर्व शिवसेना नगरसेवक भेट घेऊन निवेदन देणार.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
21.7 ° C
21.7 °
21.7 °
97 %
6.3kmh
100 %
Sat
22 °
Sun
23 °
Mon
25 °
Tue
28 °
Wed
29 °
error: Content is protected !!