लोकक्रांती
श्रीगोंदा, दि.३० नोव्हेंबर २०२३ :
श्रीगोंदा तालुका व श्रीगोंदा शहर दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने आज श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर दुधदरवाढीसाठी महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना दुधाचा अभिषेक घालुन आंदोलन करण्यात आले. यावेळी दुधाचा बाजार वाढवण्यासाठी तहसीलदारसाहेब यांना निवेदन देण्यात आले
या निवेदनामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या एकंदरीत दूध उत्पादनाचा खर्च पाहता आज शेतकऱ्यांच्या हातामध्ये काहीच शिल्लक राहत नाही आज प्रत्येक व्यापाराला त्याच्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार त्याला आहे परंतु दुर्दैवाने शेतकऱ्याने उत्पादित केलेल्या त्याच्या कुठल्याही मालाचा भाव हा त्याला ठरवता येत नाही खऱ्या अर्थाने ही खूप मोठी शोकांतिका आहे .
या गंभीर प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील अनेक ठिकाणी आंदोलने करून जनजागृती करण्यात आली. आज त्याचाच निषेध म्हणून महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना दुगधाअभिषेक आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील नेत्यांना या गंभीर प्रश्नावर लक्ष द्यायला वेळ नाही.सर्व नेते स्वहित जपण्यात आणि माया जमवण्याचा व्यस्त आहेत आशा प्रकारे तीव्र नाराजी आंदोलन कर्त्यांनी व्यक्त केली
निवडणुकीला सर्वस्व अर्पण करणारा त्यांचा दूध उत्पादक कार्यकर्ता आज अडचणीत आला असताना नेते मात्र त्याला साथ द्यायला तयार नाहीत अशा तीव्र भावना यावेळी आंदोलकांनी मांडल्या. मागण्या मान्य न झाल्यास आमदार आणि खासदारांच्या तसेच दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या निवासस्थानी तीव्र आंदोलन करू असा इशारा अध्यक्ष सोनू कोथींबीरे यांनी यावेळी दिला.
यावेळी दूध उत्पादक संघर्ष समितीचे अध्यक्ष सोनू कोथिंबीरे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे, विनोद होले, बंटी बोरुडे, विलास रसाळ, श्याम जरे,सागर बोरुडे,सागर, रसाळ, संतोष कोथींबीरे, कालिदास कोथिंबीरे, संकेत होले, विकास फटे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.