संभाजी ब्रिगेडकडून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा निषेध करत राजीनाम्याची मागणी..!

जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे यांच्या नेतृत्वाखाली सर्व बहुजन संघटनांने दिला जाहीर पाठिंबा..!

लोकक्रांती
श्रीगोंदा, दि.९ डिसेंबर २०२३ :
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दि. १४ नोव्हेंबर रोजी बळीप्रतिप्रदेच्या दिवशी बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवल्याचा फोटो प्रसिद्ध केला होता.महासम्राट बळीराजा हे संपूर्ण बहुजन समाजाचे आराध्य दैवत असून सर्वाना वंदनीय आहेत. ज्ञायी आणि समताधीष्टीत राजा म्हणून वामनाला दान दिल्याचा इतिहास असताना वामनाचे बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवल्याचा फोटो प्रसिद्ध करून आमच्या भावना दुखावण्याचा व इतिहासाची मोडतोड करण्याचा प्रयत्न चाकणकर करत आहेत असं संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष अरविंद कापसे यावेळी बोलताना म्हणाले.

हा प्रकार सहन झाला नाही म्हणून सामाजिक चळवळीत काम करणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक प्रदीप कणसे यांनी याबाबत चाकणकरांना जाब विचारला म्हणून चाकणकरांनी सूड भावनेने आपल्या भावाला पुढे करून प्रदीप कणसे यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेचा व संवेधानिक पदावर बसलेल्या रुपाली चाकणकर यांनी नैतिक जबाबदारी लक्षात घेवून आपल्या पदाचा व सत्तेचा गैरवापर केला म्हणून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

तसेच स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या व प्रत्येक वेळी शाहू-फुले-आंबेडकर यांचे नाव घेणाऱ्या चाकणकरांनी महात्मा फुले यांनी आपल्या गुलामगिरी या ग्रंथात बळीराजा आणि वामन यांचा सत्य इतिहास मांडला असून तो अभ्यासण्यासाठी संभाजी ब्रिगेड संपूर्ण महाराष्ट्रातून गुलामगिरी ग्रंथ व बळीराजाने वामनाला दान देणारा फोटो पोस्टाद्वारे भेट म्हणून पाठवणार आहे असेही यावेळी सांगण्यात आले.

यावेळी शिंदे गटाच्या नेत्या मिराताई शिंदे, छत्रपती रयत क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष समीर शिंदे, RPI चे तालुकाध्यक्ष राजू जगताप, सुनील ढवळे, राजेंद्र राऊत,गणेश पारे, दिलीप लबडे तालुकाध्यक्ष नानासाहेब शिंदे,संभाजी ब्रिगेडचे पक्षाचे तालुकाध्यक्ष शाम जरे,हेमंत हिरडे,गोरख घोडके,सुभाष बोराडे व मोठ्या संख्येने बहुजन चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
light rain
25.5 ° C
25.5 °
25.5 °
76 %
6.1kmh
100 %
Sat
24 °
Sun
22 °
Mon
23 °
Tue
27 °
Wed
28 °
error: Content is protected !!