लोकक्रांती
श्रीगोंदा, दि.१२ डिसेंबर २०२३ :
यावर्षी अत्यल्प पावसाने शेतकऱ्यांची पिके जाळली कृषी खात्याने आणि विमा कंपन्यांनी याचे पंचनामे देखील केले होते. राज्याच्या कृषीमंत्री यांनी विमा कंपन्यांना दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची अग्रीम रक्कम सोडण्याचे आदेश देखील दिले होते. दिवाळी होऊन देखील शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची अग्रीम रक्कम जमा झाली नाही.विमा कंपन्यांवर सरकारचा वचक दिसत नाही.यावर्षी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्यांना सरकारने त्वरित मदत करावी अशा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसील कार्यालय श्रीगोंदा येथे कृषिमंत्री यांच्या पुतळ्याचे दहन आंदोलन करण्यात आले त्यामध्ये पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप करून आंदोलकांना पुतळा दहन करण्यापासून रोखले त्यावेळी आंदोलकांनी निवेदन देऊन आंदोलन स्थगित केले.
यावेळी शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत असताना कुठं थोडा फार कांदा शेतकऱ्यांच्या हाती लागला होता त्या कांद्यावर मार्च पर्यंत निर्यातबंदी लावून सरकारने शेतकऱ्यांच्या अन्नात माती मिसळण्याचे काम केले आहे.या निर्यातबंदी मुळे कांद्याचे भाव ४५०० रुपये प्रति किंट्टल वरून २२००रुपये किंट्टल वर आले याने शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले.
सरकार एकीकडे सांगते शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय करावा आता दुधाचे दर कमी झाल्यामुळे दूध व्यवसाय सुद्धा अडचणीत आला आहे.दुधाचे दर वाढविण्यासाठी सरकारने अनुदान द्यावे.उसाला यावर्षी कुठं चांगला भाव मिळू लागला तर केंद्र सरकारने उसा पासून इथेनॉल निर्मिती ला बंदी घातली आहे. कापूस,तूर,सोयाबीन हे शेतकऱ्याची पिके मार्केटला यायच्या आधीच सरकार ने कापूस गाठी,तूर,सोयाबीन आयत करून या पिकांचे भाव पाडले आहे.मागील वर्षी सतत संतधार पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा सरकार ने अजून नुकसान भरपाईची रक्कम जमा केली नाही.
हे सरकार शेतकरी विरोधी असून यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाही तर संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र मध्ये सर्व कार्यक्रम उधळून लावण्यात येतील अशा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने या आंदोलनावेळी देण्यात आला.
यावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष संग्राम देशमुख, संभाजी ब्रिगेड अहमदनगर जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे, जिल्हा कार्याध्यक्ष सुनील ढवळे,तालुका अध्यक्ष नाना शिंदे, शहर अध्यक्ष विजय वाघमारे, गणेश पारे, जिल्हा संघटक सागर हिरडे, तालुका उपाध्यक्ष दिलीप लबडे संभाजी ब्रिगेड पार्टी, समीर शिंदे छत्रपती क्रांती सेना जिल्हाध्यक्ष, संतोष काळाने, अविनाश मिसाळ, अमोल वडवकर, योगेश देशमुख, माऊली कन्हेकर,अमोल घोडके,बाप्पू गंगरडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते यावेळी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.