लोकक्रांती
श्रीगोंदा, दि.१८ डिसेंबर २०२३ :
श्रीगोंदयातील बऱ्याच ठिकाणच्या सरकारी कार्यालयामध्ये दलालांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो व त्यांच्या मार्फत सामान्य नागरिकांची कामा साठी अडवणूक केली जाते या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आवाज उठवत तहसीलदार हेमंत ढोकले यांना निवेदन दिले. श्रीगोंदा शहरात मध्यवर्ती ठिकाणी तहसील कार्यालय, सिटी सर्व्हे कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, पोलीस स्टेशन, पंचायत समिती, तलाठी कार्यालय, नगरपरिषद, आरोग्य विभाग ही कार्यालये असून शहरात इतर ठिकाणी कृषी कार्यालय, बांधकाम विभाग, कुकडी पाटबंधारे, वन विभाग, इत्यादी कार्यालये कार्यरत आहेत. ही सर्व महत्वाची शासकीय कार्यालये असून या ठिकाणी तालुक्यातून लोक आपापल्या कामासाठी नित्य येत असतात. ते येथील दादालांच्या जाळ्यात अलगद अडकतात त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणे गरजेचे आहे.
श्रीगोंदा तहसिल कार्यालयात पुरवठा विभागात लोकांची रेशनकार्ड संदर्भातील कामासाठी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. पुरवठा विभागातील कर्मचारी हे काही खाजगी कर्मचारी व दलाल लोकांना हाताशी पाळून त्यांचे मार्फतच रेशनकार्डचे काम घेऊन आले तरच लोकांचे काम होणार असे लोकांना सांगून ते दलालामार्फत रेशनकार्ड काढून देण्यासाठी हजारो रुपये उकळत आहेत.
तसेच तहसील कार्यालयातील इतर विभागात देखील रोज तेच तेच दलाल लोक कार्यालय सुरु झाल्यापासून संध्याकाळी ऑफिस सुटेपर्यंत तहसिल कार्यालयात इकडून तिकडे दलाली करत फिरत असतात.हिच परिस्थिती तहसील कार्यालयाचे आवारात असणारे सिटी सर्व्हे ऑफिस, दुय्यम निबंधक कार्यालय, पोलीस स्टेशन येथेही आहे.
या संदर्भात तहसिल कार्यालयात व इतर कार्यालात काम घेऊन येणाऱ्या सर्व सामान्य लोकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठकारे पक्षाशी संपर्क केल्यानंतर आम्ही सर्व पदाधिकारी व तक्रार करणारे व्यक्ती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह संबंधित पुरवठा विभागात गेलो असता त्या कार्यालयाला अक्षरशः खाजगी कर्मचारी व दलालांचा विळखा पडलेला होता व काम घेऊन आलेल्या सामान्य नागरीकांना मात्र कार्यालयाबाहेर ताटकळत उभे ठेवण्यात आलेले होते. यावेळी आम्ही सदर प्रकार फेसबुक लाईव्ह देखील केलेला होता व या अनागोंदी कारभाराबाबत संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली.
ही बाब त्याच दिवशी आपले निदर्शनासस आणून दिली परंतू आपण त्या संदर्भात कोणतीही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे या विरोधात आपले अधिनस्त असलेले सर्व विभाग, तसेच दुय्यम निबंधक कार्यालय, सिटी सर्व्हे कार्यालय, पोलीस स्टेशन यांचे अनागोंदी कारभार, सरकारी कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार करण्यासाठी त्यांच्या हाताखाली बेकायदेशीरपणे ठेवलेले खाजगी कर्मचारी व दलाल यांचेवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अन्यथा यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना स्टाईलने तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल. असा इशारा यावेळी देण्यात आला. हे निवेदन शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे यांचे नेतृत्वाखाली देण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुका संघटक सुरेश देशमुख, जमील शेख, सागर खेडकर, शिवाजी समदडे, रघुनाथ सूर्यवंशी, नितीन लोखंडे, चंद्रकांत धोत्रे, दिलीप आनंदकर, शरद नागवडे, बाबासाहेब चोरमले, भीमराव भिसे, रोहिदास मस्के, संतोष चिकलठाणे, जनाबाई गायकवाड, सुनील घोडके, लक्ष्मण सोनवणे, दत्तात्रय बनसोडे, कृष्णा भालेराव, ओंकार शिंदे, रावसाहेब डांगे, निलेश साळुंखे, शिवाजी दांगडे, राजू तोरडे, सुनील शिंदे, देविदास तोरडे, नितीन शिंदे, गणेश लाटे, दादासाहेब मुंडेकरी, अनिकेत मांडे, प्रवीण खेतमाळीस, चिमणराव बाराहाते, संभाजी पाचपुते, बाळासाहेब शिंदे, संभाजी घोडके, हरिभाऊ काळे, सुदाम मखरे, दिलीप पोटे, अविनाश दिवटे, रंगनाथ डाळिंबकर, मारुती सुंबे, सुदाम कुटे, सुदाम सावंत, विजय सावंत, सुशांत भंडारी हे यावेळी उपस्थित होते तसेच खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक युवा सैनिक पदाधिकारी उपस्थित होते.