लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. २० डिसेंबर २०२३ :
पारगाव सुद्रिक या ठिकाणी जेष्ठ नागरिक स्त्री व पुरुष यांचा सन्मान करण्यात आला स्रियांना साडी व चोळी देऊन तर पुरुषांना चालण्यासाठी काठ्या देऊन सौ अनुराधा राजेंद्र नागवडे संचालिका अहमदनगर जिल्हा सहकारी बँक यांच्या हस्ते सन्मान व सत्कार करण्यात आला.
या वेळी सौ अनुराधा राजेंद्र नागवडे यांनी श्रीगोंदा तालुक्यातील ज्येष्ठ मंडळी यांना कोणत्याही प्रकारच्या अडचण आल्यास मला संपर्क साधावा मी आपल्याला सर्वतोपरी सहकार्य व मदत करेल असे आव्हान केले
या कार्यक्रमासाठी तालुक्यातील ज्येष्ठ मंडळी तालुकाध्यक्ष बशीर काजी, सचिव छत्तीसे, डॉ पांडुरंग लाड, बाळासाहेब ओहोळ, पी जे दरेकर गुरूजी, सौ घोडके कार्यक्रमाचे आयोजन सौ हिराबाई गोरखे राजेंद्र कोठारी यांनी केले होते या कार्यक्रमासाठी गावातील सरपंच उपसरपंच चेअरमन व्हाईस चेअरमन गावातील ज्येष्ठ नागरिक स्त्री पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार शिवाजी ननवरे यांनी मानले.