७२ हजार रुपयांचा ऐवज घेऊन चोर पसार?श्रीगोंद्यातील घटना..!!

टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि. १ सप्टेंबर २०२२ : शहरातील कासार गल्ली येथे वास्तव्यास असलेले राजेंद्र कोथिंबिरे हे काल दिनांक ३१ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री २:०० वाजेपर्यंत घरी मोबाईल पाहत बसले होते. २:०० वाजल्यानंतर झोप लागल्याने मोबाईल उशाला ठेवून झोपी गेले. त्यांचा मुलगा शुभम हा गणपती मंडळाचे कामानिमित्त गल्लीत बाहेर गेलेला असल्याने, त्यांनी घराचे दोन्ही दरवाजे न लावता नुसते लोटले होते.सकाळी ७:०० वाजण्याच्या सुमारास झोपेतून उठल्यानंतर कपाट व घरातील सामानांची उचकापाचक झालेली दिसली. बेडरूम व किचन रूम मध्ये सामान अस्तव्यस्त पडलेले दिसले. कपाटातील सोन्याचे दागिने व ५० हजार रुपये रोख रक्कम दिसली नाही. उशाला ठेवलेला मोबाईल ही नव्हता.. किचन मधील इंडक्शन शेगडी गायब होती.. यावरून खात्री झाली की, घरामध्ये चोरी झाली आहे.

त्यानुसार श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीमध्ये राजेंद्र कोथिंबिरे यांनी पंधरा हजार रुपये किमतीची एक सोन्याची अंगठी, पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल, दोन हजार रुपये किमतीची इंडक्शन शेगडी व पन्नास हजार रुपये रोख रक्कम अशी एकूण ७२ हजार रुपये किमतीची चोरी अज्ञात चोरट्याने केली असले बाबत दीलेल्या फिर्यादिवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये भादवी कलम ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्त्रोत:(फिर्याद)

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
30 ° C
30 °
30 °
55 %
11.1kmh
100 %
Sun
31 °
Mon
34 °
Tue
34 °
Wed
33 °
Thu
34 °
error: Content is protected !!