पत्रकारांच्या अनेक दिवस रखडलेल्या विषयावर नगरपालिका मुख्याधिकारी यांना शिवसेनेचे निवेदन..!

श्रीगोंदा शहरामध्ये पत्रकार भवणासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत मुख्याधिकारी श्रीगोंदा नगरपरिषद यांना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले

लोकक्रांती
श्रीगोंदा, दि.१ जानेवारी २०२४ :
श्रीगोंदा तालुक्यातील पत्रकार बांधवांची शहरात आल्यावर बैठकीची होणारी गैरसोय लक्षात घेता, श्रीगोंदा नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात पत्रकार बांधवांची बैठक व्यवस्था होण्यासाठी पत्रकार भवन अथवा पत्रकार कक्ष उपलब्ध करून द्यावा. यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या श्रीगोंदा तालुका पदाधिकाऱ्या मार्फत आज श्रीगोंदा नगरपालिकेला निवेदन सादर करण्यात येत आहे.

श्रीगोंदा शहरात विविध शासकीय, प्रशासकिय कार्यालये आहेत. तालुक्यातील विविध भागातून वेगवेगळ्या वृत्तपत्रांचे वार्ताहर व वृत्तपत्र प्रतिनिधी विविध सामजिक, राजकीय आणि प्रशासकीय बातम्या व माहिती संकलनासाठी शहरात येतात. मात्र येथे आल्यावर त्यांना बैठकीसाठी किंवा बसण्यासाठी हक्काचे ठिकाण नाही असे निदर्शनास येत आहे. त्यांच्या बैठकी व्यवस्था व्हावी यासाठी श्रीगोंदा शिवसेना तालुका पदाधिकारी मार्फत प्रमुख मागणी करण्यात येत आहे की, आपल्या स्थनिक प्रशासना मार्फत सोईस्कर जागा उपलब्ध करून पत्रकारांची गैरसोय दूर करावी आणि दिनांक ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांना पत्रकार भवन किंवा पत्रकार कक्षासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा ठराव करण्यात यावा.

मुख्याधिकारी साहेब, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवक यांच्यामार्फत पत्रकार दिनानिमित्त पत्रकार भवन मंजूर करून आगळेवेगळे शुभेच्छा देण्यात याव्या अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मुख्याधिकारी साहेबांकडे करण्यात आली यावेळी उपस्थित संतोष खेतमाळीस, सुरेश देशमुख, निलेश साळुंके, दिलीप आनंदकर, ओंकार शिंदे, नितीन लोखंडे, सागर खेडकर, शिवाजी समदडे, चंद्रकांत धोत्रे, हरिभाऊ काळे, जमीर शेख, व शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
light rain
25.9 ° C
25.9 °
25.9 °
75 %
5.9kmh
100 %
Sat
27 °
Sun
22 °
Mon
23 °
Tue
26 °
Wed
28 °
error: Content is protected !!