लोकक्रांती
श्रीगोंदा, दि.४ जानेवारी २०२४ :
ग्रामीण विकास केंद्र व कोरो इंडिया मुंबई संचलित सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मुक्त संवाद कार्यक्रम ढोकराई येथे घेण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लता सावंत यांनी केले.आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व महिलांचे स्वागत करून कार्यक्रमाच्या अध्यक्षा ची निवड उज्वला मदने यांनी केली तसेच अनुमोदन सुनिता बनकर यांनी दिले दीप प्रज्वलन एकल महिलांच्या व छोट्याशा सावित्रीच्या व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले त्याच्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातिला सावित्रीबाई फुले यांच्या ओव्या, गाणी म्हणण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पल्लवी शेलार यांनी सांगितली आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे मनोगते झाली छोटेसी सावित्री वेशभूषा केलेल्या मुलीने सावित्रीबाई फुलें बद्दल माहिती दिली. सावित्रीबाईंना महिलांसाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला ज्योतिबा सावित्री क्रांतीसुर्य आणि ज्ञानज्योत नसती तर महिलांसाठी शाळा उभी राहिली नसती आपण सारे सावित्रीच्या लेकी आहोत आपणही त्यांचा पुढे वारसा चालवला पाहिजे आपल्या हक्क अधिकारासाठी आपण लढा उभा केला पाहिजे आणि आपल्या मुलींना शाळा शिकवली पाहिजे आपल्याही मध्ये संघर्ष करण्याचे धाडस निर्माण झालं पाहिजे हेही सांगण्यात आले.
प्रमुख वक्ते यांनी त्यांच्या मनोगता मध्ये सावित्रीच्या जन्मापासून ते सावित्रीची दिपज्योत मावलेपर्यंत खडतर प्रवासाचे वर्णन करण्यात आले. तसेच भटके विमुक्त समाजातील महिलांचे मुक्त संवाद करण्यात आला. सोशल नॉम कशा पद्धतीने तोडता येईल यावर चर्चा करण्यात आली.तसेच की स्री स्रीची दुश्मन नसते तर रूढी परंपरेने पुरुष प्रधांनतेला वर्चस्व दिले कुठेतरी स्री दबले गेली हे संवादात सांगण्यात आले.भटके विमुक्त समाजातील महिलांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले त्यावरती आपण छोटी क्लिप तयार करून घेतली. महिलांनी मोकळेपणाने आपल्याशी संवाद साधला अशा प्रकारे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
या कार्यक्रमास उपस्थित अध्यक्ष सौ.समिक्षा ठोमस्कर, लिंपणगाव सरपंच प्रमुख वक्ते सौ.पावटे मॅडम जि.प. प्रा.शाळा मुले श्रीगोंदा, बाळासाहेब धायगुडे ग्रामसेवक लिंपणगाव, सौ. अनिता काळे पंचायत समिती महिला बचत गट समन्वयक, सौ. सुवर्णाताई पाचपुते सुवर्णरत्न पतसंस्था अध्यक्ष, सौ. प्रनोतीमाई जगताप कुकडी सहकारी साखर कारखाना संचालिका, सौ. शिल्पा गायकवाड सामाजिक कार्यकर्त्या लता सावंत, शेलार पल्लवी, उज्वला मदने, सुनीता बनकर,रोहिणी राऊत, सारिका गोंडे, शर्मीला अग्रवाल, लताताई काळाने, ज्योती शिंदे, अमृता शिंदे, पल्लवी सकट, सुनीता सुतार, सिंधूबाई शिंदे, राजू शिंदे यांच्यासह अनेकांनी योगदान दिले. कार्यक्रमाच्या शेवटी रोहिणी राऊत यांनी आभार मानले.