‘या’ गावात एकाच रात्री फोडली १३ दुकाने; ग्रामपंचायत ची हजारोंची सी सी टी व्ही यंत्रणा आहे बंद?

टीम लोकक्रांती : मांडवगण फराटा दि. २ सप्टेंबर २०२२ : श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी गावाच्या अगदी नजदीक असलेल्या शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे काही अज्ञात चोरट्यांनी रात्रीत सुमारे तेरा दुकानं फोडली असल्याची घटना घडली आहे. या चोरीमध्ये रोख रकमेसह डी.एस.एल.आर. फोटो कॅमेरा चा समावेश आहे. यातील काही दुकाने पोलीस चौकी पासून हाकेच्या अंतरावर असताना झालेल्या नमूद चोरीच्या घटनांमुळे येथील दुकानदारांमध्ये मोठे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून परिसरातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. येथील भरचौकात तसेच मुख्य रस्त्यावर असणाऱ्या विविध व्यवसायिकांची चोरट्यांनी १३ दुकाने फोडून चोरी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या पूर्वी देखील एटीएम चोरीचा प्रकार घडला होता. काही अंतरावर पोलीस चौकी असूनही एका रात्रीत तेरा दुकाने चोरट्यांनी फोडल्याने ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

ग्रामपंचायतीने हजारो रुपये खर्च करून गावात चौका चौकात बसवलेली सी.सी.टी.व्ही. यंत्रणा रस्त्याच्या खोदकामानंतर बंद पडलेली आहे. तर, ग्रामपंचायतीने सी.सी.टी.व्ही. चालू करून घ्यावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच शिरूर हवेलीचे आमदार ॲड्. अशोक पवार, शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस उपअधीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहायक पोलीस निरीक्षक संदीप यादव यांनी घटनास्थळांची पाहणी करून पंचनामे केले. घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते.

याबाबत माहिती देताना उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांनी सांगितले की, या चोरी मध्ये २० ते २५ वयोगटातील पाच ते सहा जणांचा समावेश असण्याची शक्यता आहे.  काच फोडून एका दुकानात प्रवेश करीत असताना एका चोराच्या पायाला अथवा डोक्याला काच लागून तो जखमी झाला आहे. जर अशा अवस्थेतील इसमाने शिरूर, दौंड किंवा श्रीगोंदा तालुक्यातील दवाखान्यात जखमीवर उपचार केले असल्यास संबंधित डॉक्टर अथवा अशी जखमी व्यक्ती कोणा ग्रामस्थांना आढळल्यास पोलीसांनी संपर्क साधावा. असे त्यांनी बोलताना सांगितले.
स्त्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
23.4 ° C
23.4 °
23.4 °
82 %
7.9kmh
100 %
Mon
23 °
Tue
26 °
Wed
25 °
Thu
28 °
Fri
30 °
error: Content is protected !!