लोकक्रांती
श्रीगोंदा, दि.४ जानेवारी २०२४ :
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सव निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे श्रीगोंदा तालुका व शिव आरोग्य सेना श्रीगोंदा तालुका यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. रक्तदान शिबिर आज छत्रपती शिवाजी महाराज चौक हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे श्रीगोंदा शहर वाचनालय समोर संपन्न झाला या रक्तदाना शिबिरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये युवक महिलावर्ग नागरिकांनी सहभाग नोंदवला रक्तदान शिबिरामध्ये ९७ रक्तदात्यांनी रक्तदानामध्ये सहभाग नोंदवला.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिवसेना उपनेते साजन भैय्या पाचपुते यांच्या मातोश्री सुनंदा वहिनी पाचपुते व शिव आरोग्यसेना जिल्हाप्रमुख इम्ताज भाई शेख यांच्या हस्ते संपन्न झाले रक्तदान शिबिर शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे यांच्या पुढाकार्यातून संपन्न झाले.
या रक्तदाना शिबिरामध्ये विशेष मेहनत शिवाआरोग्य सेना जिल्हा उपप्रमुख रावसाहेब डांगे, शिवा आरोग्य सेना तालुकाप्रमुख संभाजी घोडके, शिवा आरोग्यसेना शहर प्रमुख दिलीप आनंदकर, सागर खेडकर, सुदाम मखरे, ओमकार शिंदे, राजू तोरडे, सुरेश देशमुख, निलेश साळुंके, संतोष खेतमाळीस, हरिभाऊ काळे, शहाजी बोरुडे, सुनील घोडके, नितीन शिंदे, विजय सावंत यांच्या विशेष मेहनतीने हे रक्तदान संपन्न झाले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सव निमित्त या पंधरवड्यामध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत असे मत शिवसेना तालुका प्रमुख बाळासाहेब दुतारे यांनी व्यक्त केले यावेळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक युवासैनिक आरोग्य सैनिक उपस्थित होते.