लोकक्रांती
श्रीगोंदा, दि.९ जानेवारी २०२४ :
श्रीगोंदा तालुक्यातील सामाजिक भान असणाऱ्या सक्रिय पत्रकारांची आज संत शेख महमंद बाबा दर्गाह मध्ये संघटना स्थापनेबाबत सकारात्मक चर्चा झाली. यात उपस्थित पत्रकारांनी त्यांच्या संदर्भातील विविध समस्यांसह उपाय योजनांवर साधक बाधक चर्चा केली. यात संघटनात्मक पातळीवर निरनिराळ्या त्रुटी आणि संघटना बांधणी करावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
काही संघटनेतील एकाधिकार शाहीमुळे सर्व सामान्य पत्रकार, वार्ताहार, माध्यम प्रतिनिधी, इलेक्ट्रिक पत्रकार यांची उपेक्षा होत आहे. आणि काही ठराविक लोकं यात आपले हित साध्य करु पाहत आहे. अश्या लोकांपासून सर्वांचे नुकसान होत असुन, बहुतांश पत्रकारांचे सर्व प्रकारे हाल होत आले आहेत. अशी भावना व्यक्त झाली.
त्यामूळे सर्वांच्या हिताचे मुद्दे विचारात घेऊन सर्वजण हिताय अशी संघटना निर्माण करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देत आज संत शेख महमंद बाबा यांच्या दर्गाहात सर्वानुमते एकी करण्याचा निर्धार करुन, सर्वांसाठी समान असणारे व्यासपीठ निर्माण करण्याची तयारी सर्वांनी दाखवली.
यावेळी पत्रकार शिवाजी साळुंके (सार्वमत), पत्रकार समिरन नागवडे (प्रभात), पत्रकार योगेश चंदन (पुण्य नगरी), पत्रकार चंदन घोडके (बहूजन महाराष्ट्र), पत्रकार राजु शेख (सिटिझन), पत्रकार माधव बनसुडे (लोकमंथन), पत्रकार शफीक हवालदार (पॉलिटिकल फेस),पत्रकार अमर घोडके (साधना न्युज), पत्रकार किशोर मचे (लोकक्रांती) पत्रकार रमेश गांधी (ज्येष्ठ पत्रकार) इत्यादी पत्रकार यावेळी बैठकीस उपस्थित होते. यात अनेकांनी आपापल्या पद्धतीने नमूद विषयी सूचना केल्या.
लवकरच नूतन संघटना स्थापन करण्यात येईल किंवा राज्य/राष्ट्रीय संघटनेला जोडण्यात येईल असे आश्वासन देऊन बैठक संपन्न झाली. या बैठकीचे आयोजन राज्य मराठी पत्रकार संघातुन बाहेर पडलेल्या पत्रकार अनिल तुपे (अहिल्याराज) यांनी केले व उपस्थितांचे आभार मानले.