बेलवंडी येथील रामलीला सोहळ्याला मुस्लिम बांधवांची पंगत..!

या महाप्रसादाच्या पंक्तीमुळे हिंदू- मुस्लिम एकोपा अजून दृढ होण्यास मदत होणार आहे.

लोकक्रांती
श्रीगोंदा, दि.२१ जानेवारी २०२४ :
२२ जानेवारीला आयोध्येत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राममंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठापण होणार आहे त्यामुळे देशातील वातावरण राममय झाले आहे त्याचेच औचित्य साधून बेलवंडी गावातील मुस्लिम समाज मौलाना व जमा मशीद ट्रस्ट अध्यक्ष सलीम शेख, बाबा हवालदार, इनुस मौलाना समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने व सरपंच ऋषिकेश शेलार यांच्या वतीने महाप्रसादाच्या पंगतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमांमध्ये मुस्लिम बांधवानी दिलेल्या या पंगतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे तसेच आज होणाऱ्या या पंगतीचा सर्वानी लाभ घेण्याचे आवाहन मुस्लिम बांधवांसह सरपंच ऋषिकेश शेलार यांनी आयोजकांकडून केले.

धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना, देशातील हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण करून धार्मिक दंगली घडवण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या समाजकंटकांना या माध्यमातून एक सनसणीत चपराक बसणार आहे संपूर्ण देशाने आदर्श घ्यावा असेच हे उदाहरण म्हणावे लागेल. संत शेख महंमद महाराज हे श्रीगोंदा शहराचे ग्रामदैवत आहे हिंदू मुस्लिम इथे कायम एकोप्याने राहतात या महाप्रसादाच्या पंक्तीमुळे हिंदू- मुस्लिम ऐक्याचा हा एकोपा अजून दृढ होण्यास मदत होणार आहे.

पोलीस निरीक्षक बेलवंडी यांनी केलेल्या आव्हानाला मुस्लिम समाजाने सकारात्मक प्रतिसाद देऊन बेलवंडी गावातील सर्व मुस्लिम व खाटीक समाजाने सदर दिवशी कोणत्याही प्रकारे मास व मच्छी विक्री करणार नाही असे आव्हान केलेले आहे.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
24.5 ° C
24.5 °
24.5 °
81 %
7.4kmh
100 %
Sun
26 °
Mon
27 °
Tue
25 °
Wed
25 °
Thu
28 °
error: Content is protected !!