लोकक्रांती
श्रीगोंदा, दि.20 मार्च 2024 :
श्रीगोंदा येथील हिंन्दू-मुस्लीम एकात्मतेचे प्रतिक छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा श्रीमंत मालोजी राजे भोसले यांचे गुरू सुफी संत शेख महंमद बाबा यांच्या ४०६ व्या संदल-उर्स/यात्रा उत्सवा निमित्त दि. १८ मार्च २०२४ रोजी नागपूरचे प्रसिद्धी कव्वाल युसुफ शोला कव्वाली कार्यक्रम संपन्न झाला.
कव्वाली कार्यक्रम सुरु करण्यापुर्वी दि. १८ रोजी छत्रपती शहाजीराजे भोसले यांची जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे शेख महंमद बाबा यांचे वंशज व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आहे. या वेळी संभाजी ब्रिग्रेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कासपे, शाम जरे, नानासाहेब शिंदे, पत्रकार चंदन घोडके, अमर घोडके, विषाल चव्हाण, प्रशांतभाऊ गोरे, सागरभाऊ गोरे, बापुशेठ माने, राहुल वाळके, सतिष मोरे, विषाल सकट, सतिष बोरूडे, बच्चुशेठ धर्माधीकारी, बाळा मखरे, दिपक मखरे, प्रविण काळे, सोहेल शेख, नवाज शेख, प्रा. महेंद्र मिसाळ, डॉ. घोडके, शेख महंमद बाबा यांचे वंशज व देवस्थान चे प्रमुख आमीनभाई शेख,सोहेल शेख,अजीज शेख,चांद शेख,राजु शेख यांच्या सह महिला/पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होत कार्यक्रमाचा आनंद घेतला.
कव्वाल युसुफ शोला यांनी यावेळी एकात्मता, भाईचारा, थोर महापुरुष, शेख महंमद बाबा यांचे वर गित गायन केले.
तसेच दि. १७ रोजी संदल (चंदन) दिवशी रात्री ११.३० च्या सुमारास शेख महंमद बाबा यांच्या कबरीस बाबांचे वंजश यांच्या हस्ते विधीवत पुर्जा करत संदल लावण्यात आला.
दि.१९ रोजी सायंकाळी ७.१५ वा. बाबांच्या वंशजांच्या वतीने लंगरखाना (महाप्रसाद) आयोजन करण्यात आले होते.
आज दि.२० मार्च रोजी उरुस यात्रा मुख्य दिवश आज पहाटे नामज च्या वेळी शेख महंमद बाबा यांच्या वंशज, वारसांच्या हस्ते विधीवत पुजा करत उत्सवास प्रांरभ करण्यात येतो. यात्रा उत्सवा निमित्त देश-राज्य भरा- तून बाबांना माननारे भावीक भक्त दर्शनासाठी येतात. शेख महंमद बाबा दर्गाह ट्रस्ट च्या वतीने उत्सवाचे योग्य नियोजन करण्यात आले आहे.