लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. १४ एप्रिल २०२४ :
श्रीगोंदा सिद्धार्थ नगर येथील आयोजीत डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती २०२४ कार्यक्रमात श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय, सामाजिक, प्रशासकिय, पत्रकारिता, शैक्षणिक, कायदा अश्या वेगवेगळ्या चळवळीत आणि प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी डॉ आंबेडकर स्मारक, श्रीगोंदा येथे घेण्यात आलेल्या धम्म पूजापाठास हजेरी लावत ध्वजारोहन व महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, तसेच तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांना पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. तर, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या येथे सहभागी समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या.
दिनांक १३ एप्रिल २०२४ रोजी मध्यरात्री महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करत समाजातील लहान थोरं आणि महिलांच्या उपस्थितीत पूजापाठ घेऊन.. अभिवादन करत मोठया प्रमाणात आतिषबाजी आणि फटाके वाजवून जयंतीचा आनंद साजरा करण्यात आला.
यावेळी आमदार बबनराव पाचपुते, अनुराधाताई नागवडे, प्रतिभा आक्का पाचपुते, बाळासाहेब शेलार, निलेश गायकवाड, संग्राम घोडके, हृदय घोडके, उस्तव समिती अध्यक्ष अजय घोडके, जिवाजी घोडके, सौ.सोनालिताई घोडके, शिवाजी आप्पा घोडके, सागर मोरे, विलास घोडके, अमर घोडके, गौतम अण्णा घोडके, अविनाश घोडके, राजेन्द्र उकांडे, विशाल घोडके, ज्योतीताई खेडकर, अशोक खेंडके, डॉ.अनिल घोडके, बाळु मखरे, अरविंद कापसे, राजा जगताप, नानासाहेब शिंदे, रावसाहेब घोडके, जितेंद्र पाटोळे, पोलीस उप निरिक्षक निकम, सचिन गोरे दादा, नंदकुमार ससाणे, मिलिंद घोडके, मनोज घाडगे, संदिप ससाणे सर, नंदू ताडे, ॲड.झराड, धरमजी घोडके, श्रीकांत घोडकेसह सिद्धार्थ नगर, ससाणे नगर व श्रीगोंदा शहरातील, तालुक्यातील समाज बांधव, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत त्रिसरण.. पंचशील ग्रहण करण्यात आले. पुढील कार्यक्रमात अनुराधाताई नागवडे आणि बबनराव पाचपुते यांनी मनोगत व्यक्त करताना सर्वांना डॉ. आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.
स्मांरकापासून शहरात महापुरुषांच्या प्रतिमांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी जाण्याच्या मार्गावर विविध सामाजिक पदाधिकारी आणि मान्यवरांनी प्रतिमांचे पूजन करीत अभिवादन केले. दरम्यान मिरवणुकीत शाळकरी मुलांकडून तृषाल ससाणे यांनी बसवलेले लेझीम नृत्य सादरीकरण मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले.
शनि चौकात श्रीगोंदा तालुका पत्रकार संघटनेच्या पत्रकारांकडून प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पत्रकार अंकुश शिंदे यांनी समाज बांधवांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष, पदाधिकारी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शरद नवले, वैभव मेथा, अनिल ननवरे, विनोद राऊत, विवेक पवार, पत्रकार अंकुश तुपे, राजु शेख, अमर घोडके, गणेश घोडके, संदिप घोडके, सचिन गायकवाड, सूरज घोडके, शिवा ताडे, वसिम ताडे, हृतिक शिंदे, संतोष शिंदे, नितिन शिंदे, योगेश गंगावणे, हनुमंत माने, शिवाजी ताडे, नवाज शेख, सुनिल ओहोळ, कांतिलाल कोकाटेसह लोकं उपस्थित होते. यावेळी डॉ. सौ. प्रतिभा आक्का पाचपुते व शरद नवले यांनी महामानवांच्या प्रतिमांना अभिवादन केले.
यानंतर सिद्धार्थ नगर येथील स्मारकात दुपारी नियोजित भोजनं दानाचा कार्यक्रम संपन्न झाला. याठिकाणी शहरातील, सिद्धार्थ नगर आणि ससाणे नगर येथील समाज बांधव हजर होते.
संध्याकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या समोरं लेजर शोचे आयोजण करण्यात आलते. तेथे विविध सामाजिक आणि पुरोगामी चळवळीतील गाण्यांवर कार्यकर्त्यानीं, समाजातील महिला, पुरुष आणि तरुणांनी ताल धरला.. या सर्व कार्यक्रमात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती २०२४ चे अध्यक्ष अजय घोडके, विशाल घोडके, अविनाश घोडके, सह ज्येष्ठ पदाधिकारी संग्राम घोडके, हृदय घोडके, आनंद घोडके व संपूर्ण सिद्धार्थ नगर मधील पदाधिकारी तन मन धनाने सक्रिय होत कार्यक्रम यशस्वी केला.