लोकक्रांती
श्रीगोंदा, दि.१० जून २०२४ :
सोमवार दि.१० जून रोजी वारंवार वीज गायब होत असल्यामुळे महावितरण विरोधात भीक मांगो आंदोलन करण्यात आले. श्रीगोंदा शहर व तालुक्यात विजेचा लपंडाव सुरू असून या दिवसात लाईट वारंवार गायब होते. त्यामूळे उद्योजक व्यापारी नागरिक अतिशय हैराण परेशान आहेत. तसेच याबाबत दि. २० मे २०२४ रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालय समोर आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी एस. डी. ओ. श्रीगोंदा यांच्या वतीने ३१ मे पूर्वी सर्व मेंटेनस ची कामे करून तथा खाजगी ठेकेदार नियुक्त करून एस.डी.ओ. श्रीगोंदा यांच्या मागील मागणी प्रमाणे 8 AB स्विच, आठ किलोमीटर अंतर्गत लाइन, असे अनेक प्रलंबित कामे, मान्सून पूर्व दुरुस्ती ची कामे करण्यात येतील.
असे लेखी आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते. परंतु त्या लेखी आश्वासनाच्या पत्राद्वारे अद्याप एकही मागणी पूर्ण होत नसून याउलट सद्यपरिस्थितीत २० –२२ तास लाईट जात असून अनेक व्यापारी, नागरिक हैराण झाले आहेत. तसेच ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा, येथे पेशंट वर उपचार करणे शक्य होत नाही.
पोलिस स्टेशन, दुय्यम निबंधक कार्यालय, तहसील, पंचायत समिति, भूमिअभिलेख, मान वरिष्ठ स्तर न्यायालय येथे अनेक नागरिकांची कामे होत नसून त्यांना हेलपाटे आणि मानसिक ताणला सामोरे जावे लागत आहे.तसेच दि. २८ मे २०२४ कंत्राटी कर्मचारी यांच्या थकीत वेतन संदर्भात ६ जून रोजी आंदोलन करण्याचे पत्र देण्यात आले होते.
परंतु त्याही वेळी आपल्या लेखी आश्वासना मुळे आंदोलन स्थगित करण्यात आले होते.
तरी उपरोक्त सर्व बाबींचे अवलोकन केल्यास महावितरण कंपनीचा गलथान कारभार जाणवत आहे. तसेच उपरोक्त सर्व कामे निधी अभावी करणे शक्य होत नाहीत. असे अधिकाऱ्यांचे म्हणणे असल्याने आज वैतागून नागरिकांनी आंदोलन केले.
कंत्राटी कामगारांना तीन महिन्यांपासून पगार नाही तसेच श्रीगोंदा शहरातील जुनी लाईन दुरुस्त करण्यासाठी अजूनही साहित्य पुरवठा आला नाही. अशा अनेक तक्रारी आहेत. नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहेत. याबाबत आम्ही अधीक्षक अभियंता खांडेकर यांस चार वेळा भेटलो आहे. तसेच कार्यकारी अभियंता माळी यांना सुद्धा अनेक वेळा सांगून सुद्धा त्यांच्या कामात फरक पडत नाही. यामुळे आज श्रीगोंदा शहरात प्रतीनिधिक स्वरूपात भीक मांगो आंदोलन करण्यात आले. यात अनेक नागरिक व्यापारी शेतकरी विद्यार्थी सहभागी झाले होते.त्यात सतीश बोरुडे,राजू गोरे (उपनगराध्यक्ष), ऋषिकेश गायकवाड,विशाल सकट, राम घोडके,गणेश काळे,युवराज पळसकर,वसीम शेख,वसीम ताडे,पांडुरंग पोटे, शनी चौक तेली गल्ली होनराव चौक (शिवाजी चौक) संत रोहिदास चौक झेंडा चौक दिल्ली वेस बाजार तळ बस स्टँड भैरवनाथ चौक छत्रपती संभाजी महाराज चौक ते मार्केट यार्ड परिसर ते महावितरण कार्यालय परिसर अशी भीक मागण्यात आली.३५७० रुपये जमा करून त्यातील १० टक्के रक्कम खांडेकर अधीक्षक अभियंता ३५७ रुपये माळी कार्यकारी अभियंता ३५७ रुपये व लोकप्रतिनिधी साठी १० टक्के रक्कम ३५७ रुपये अधिकारी सुर्यवंशी यांकडे देण्यात आले.
चौकट
श्रीगोंदा शहरात. आजचे भीक मांगो आंदोलन प्रातिनिधिक स्वरूपात केले असून भीक घेतल्यामुळे तरी अधिकारी सुधारतील अशी अपेक्षा आहे.आता आमचा संयम संपला आहे. वीज प्रश्न न सुटल्यास अधिकाऱ्यांना खुर्चीवर बांधून कोंडून ठेवणार आहे. त्यावेळी मात्र कायदा हातात घेऊन कुणाचीही हयगय ठेवली जाणार नाही.
— टिळक भोस
चौकट
श्रीगोंदा शहरात विजेचा खेळखंडोबा मागील तीन महिन्यांपासून सुरू आहे.त्यात सुधारणा व्हायला तयार नाही.त्यामुळे आक्रमक भूमिका घ्यावी लागणार आहे.
अधिकाऱ्यांना वठणीवर आणू.
— सतीश बोरुडे