लोकक्रांती
श्रीगोंदा, दि.१८ जून २०२४ :
श्रीगोंदा शहरातील पेडगाव रोडवरील छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक व अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी शासनाची जागा अनधिकृत रित्या अतिक्रमित करण्यात आली आहे ती जागा स्मारकासाठी मोकळी करून द्यावी यासाठी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेड कडून रक्ताभिषेक आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये अरविंद कापसे, शामभाऊ जरे,बाळूदादा मखरे, विनोद म्हेत्रे, अनिल दहातोंडे, तुषार मोटे, दिलीप लबडे, यांनी स्वतः च्या रक्ताने रक्ताभिषेक केला. तसेच मंगेश सूर्यवंशी, हेमंत पाटील, अक्षय काळे, राजाभाऊ जगताप आदींनी यावेळी रक्तदान केले.
श्रीगोंदा येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील पहिला आश्वारूढ पुतळा उभारून भव्य स्मारक उभरण्यात येणार आहे. याच चौकातून पेडगावला बहादूर गडाकडे जाण्यासाठी रस्ता आहे ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना कैदेत असताना तेथे आणण्यात आले होते त्यामुळे या चौकाचे महत्व अजून वाढले आहे.याच रस्त्यावरून महाविद्यालयीन विध्यार्थी ये जा करत असतात त्यांना या स्मारकामुळे नवी प्रेरणा मिळेल आणि पुढील पिढीला छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता,जाज्व्वल्य इतिहास समजेल हाच उद्येश डोळ्यासमोर ठेवत इथेच स्मारक व्हावे असा आग्रह केला. तसेच या आधीही स्मारकासाठी विविध प्रकारची आंदोलने करण्यात आले आहेत असे संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष अरविंद कापसे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
श्रीगोंदा नगरपरिषदेने या स्मारकासाठी ६५ लाख निधी मंजूर केला आहे तसेच
स्मारकासाठी श्रीगोंदा तालुक्याचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्याकडे
जागेची व वाढीव निधीची मागणी केली व त्यांनी या कामी लक्ष देण्याचे अश्वासन देत सदर कामासाठी १ कोटी रुपये निधी देखील मंजूर केला. त्यासाठी चौकालगतच असलेली महसुल विभागाची गट नं. १९३९ पैकी अर्धा एकर जागा स्मारकासाठी मिळणेबाबत नगरपरिषदे मार्फत मा.जिल्हाधिकारी, अहमदनगर यांना प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे. परंतू सदर जागेमध्ये असलेले अतिक्रमण सिद्ध करण्यासाठी मा. तहसिलदार, श्रीगोंदा यांच्या आदेशाने संपूर्ण गटाची मोजणी करुन मो.र.नं. ६१८/२०२४ नुसार नकाशा तयार करुन त्यावर अतिक्रमण झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. असे असताना देखील मा. तहसिलदार, श्रीगोंदा यांच्याकडून कारवाईसाठी सतत टाळाटाळ करुन अतिक्रमण करणाऱ्याला पाठीशी घालण्यात येत आहे. अशा स्वरूपाचे निवेदन तहसीलदार यांना दि ७ जून रोजी देण्यात आले होते परंतु श्रीगोंदा तहसीलदार यांनी या कामात विलंब केल्याने संबंधित शासकीय अतिक्रमीत जागेसाठी कोर्टा मार्फत स्टेऑर्डर मिळाली आणि अतिक्रमण निघण्यास पुन्हा विलंब झाला असा आरोप या वेळी आंदोलन कर्त्यांनी श्रीगोंदा तहसीलदार यांच्यावर केला.
यावेळी राहुल जगताप, घनशाम शेलार, अरविंद कापसे, नानासाहेब शिंदे,मुकुंद सोनटक्के, गोपाळ मोटे पाटील, मीराताई शिंदे यांनी मनोगत व्यक्त केली. तसेच लवकर निर्णय न झाल्यास सर्वपक्षीय अंदोलन छेडणार असा इशारा यावेळी देण्यात आला.
श्रीगोंदा तहसीलदार क्षितिजा वाघमारे यांनी लवकरात लवकर अतिक्रमण हटवण्या संबंधी योग्य ती कार्यवाही करू असे अश्वासन दिल्या नंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी घन:शाम शेलार, माजी आमदार राहुल जगताप,साजन पाचपुते, बाळासाहेब दुतारे,नानासाहेब शिंदे, अरविंद कापसे, विजय शेंडे,हरिदास शिर्के, अख्तर शेख, शामभाऊ जरे, अक्षय काळे, गोपाळ मोटेपाटील, मोलाना अत्तार, राजाभाऊ जगताप, गणेश कोथिंबीरे, मुकुंद सोनटक्के, अजीज शेख, गणेश झिटे, योगेश सावंत, आदेश शेख, मीराताई शिंदे, विकास होले आणि मोठया संख्येने शंभू प्रेमी उपस्थित होते.