शिक्षक मतदार संघ अहमदनगर जिल्ह्यात एकूण ९३.८८ टक्के मतदान..!

स्वच्छ चारित्र्याच्या कार्यकर्त्यांची फौज उभा करणार - उमेदवार सचिन झगडे

लोकक्रांती
श्रीगोंदा, दि.२७ जून २०२४ :
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक काल पार पडली.अहमदनगर जिल्ह्यामधील 11189 पुरुष मतदारांनी तर 5138 स्त्री मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकूण 93.88% मतदान अहमदनगर जिल्ह्यात झाले.

श्रीगोंदा येथील केंद्रामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीगोंदा हे केंद्र होते. या केंद्रामध्ये एकूण 899 मतदारांपैकी 832 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी 92.54 इतकी होती.सर्वच उमेदवारांच्या प्रतिनिधींनी परिसर गजबजुन गेला होता. दिवसभर शांततेत मतदान झाले.

एका संस्थेतील संस्थाधिशाने शिक्षकांना रांगेत विद्यार्थ्यांप्रमाणे आणून त्यांच्याकडून मतदान करून घेतले गेले हा चर्चेचा विषय ठरला.

प्रशासकीय अधिकारी तहसीलदार क्षितिजा वाघमारे मॅडम आणि प्रांत अधिकारी सावंत मॅडम या ठिकाणी उपस्थित होत्या. तसेच निवडणूक आयोगाचे निरीक्षकही या ठिकाणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत लक्ष ठेवून होते. प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

चौकट –
रयत शिक्षण संस्थेतील शिक्षक आणि नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार सचिन झगडे दिवसभर तळ ठोकून होते.यावेळी प्रतिनिधीशी बोलताना ते म्हणाले ही निवडणूक वेगळी ठरली. शिक्षकांना साडी, पॅन्ट-शर्ट कापड , नथ , पैशाची पाकिटे या सर्व गोष्टीचे वितरण करण्यात आले असे समाज माध्यमातून समजले. झोपडपट्टी आणि मोहल्ला नाव ठेवणाऱ्या समाजामध्ये आज शिक्षक सुद्धा ते पैसे घेऊन मतदान करतात या अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. समाजात आणि देशात ही निवडणूक शिक्षकांच्या दृष्टीने चारित्र्यावर काळा डाग आहे असे प्रतिपादन केले. येणाऱ्या काळात सकारात्मक, स्वच्छ चारित्र्याच्या कार्यकर्त्यांची बांधणी करून समाजातील हा शिक्षकांविषयीचा गैरसमज काढून टाकण्याचे आपण काम करू असा आशावाद उमेदवार सचिन झगडे यांनी व्यक्त केला.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
21.7 ° C
21.7 °
21.7 °
97 %
6.3kmh
100 %
Sat
22 °
Sun
23 °
Mon
25 °
Tue
28 °
Wed
29 °
error: Content is protected !!