जल जीवन मिशन संदर्भातील सामाजिक कार्यकर्त्यांचे आमरण उपोषण अखेर मागे..!

प्रत्यक्षात अनेक गावांचे जल जीवन योजनेचे कामे अपूर्णच..!

लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. २८ जून २०२४ :
श्रीगोंदा तालुक्यातील ७९ गावांसाठी केंद्र सरकारची हर घर जल अंतर्गत जल जीवन मिशन पाणी योजना मंजूर आहे. यापैकी फक्त १३ गावांची पाणी योजना पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु इतर गावांची योजना का रखडली ? इतर गावातील महिला व नागरिकांना या योजनेपासून अधिकारी व ठेकेदारांनी मनमानी करत दिलेल्या वेळेत पाणी योजना पूर्ण न केल्याच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते दत्ताजी जगताप व श्रीरंग साळवे हे पंचायत समिती श्रीगोंदा येथे कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसले होते.

पाणी योजनेचा कार्यारंभ आदेशातील अटी शर्तीनुसार विहीत वेळेत पुर्ण होणे बंधनकारक असताना संबंधीत अधिका-यांनी ठेकेदारांना पाठीशी घालत पाण्यापासून गावातील नागरिकांना वंचित ठेवल्यामुळे असे अधिकारी यांना निलंबीत करावे. विलंब करणारे ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करत त्यांचा ठेका रद्द करावा. गावांना वेळेत हक्काचे पाणी मिळावे. अशा अनेक मागण्यांसाठी हे बेमुदत उपोषण करण्यात आले होते.

गट विकास अधिकारी राणी फराटे यांनी मध्यस्थी करत संपुर्ण पाणी योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात येतील. चांभुर्डी गावातील पाणी योजना ४५ दिवसात पुर्ण करण्यात येईल. तसेच कामे पुर्ण करण्यासाठी येणा-या गाव पातळीवरील अडचणी लेखी स्वरुपात देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. गट विकास अधिकारी राणी फराटे यांनी वरील आशयाचे पत्र देऊन व पाणी देऊन उपोषण मागे घेण्यात आले.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
25.5 ° C
25.5 °
25.5 °
74 %
10.3kmh
100 %
Sun
25 °
Mon
27 °
Tue
24 °
Wed
25 °
Thu
29 °
error: Content is protected !!