लोकक्रांती
श्रीगोंदा, दि २८ जून २०२४ :
राजर्षी शाहूमहाराजांनी सर्व जातींच्या मुला मुलींना शिक्षण घेता यावे यासाठी कोल्हापुरात जातीनुरुप वसतीगृहे काढून शिक्षण चळवळ गतिमान केली असे प्रतिपादन डॉ. राजेश पाखरे यांनी केले ते राहुल विद्यार्थी वस्तीगृहश्रीगोंदा येथे आयोजित शाहू महाराज जयंती कार्यक्रमात अध्यक्ष पदावरून बोलत होते.
ते पुढे म्हणाले शिक्षण व आरक्षना शिवाय बहुजन समाजाची प्रगती नाही म्हणुन त्यांनी सन १९०१ साली व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना केली. मागास जाती-जमातीतल्या लोकांसाठी सरकारी नोकरीमध्ये निम्म्या जागा राखीव ठेवण्याचा आदेश काढला. शंभर वर्षांपुर्वी असा क्रांतिकारक निर्णय घेणं मोठं धा़डसाचं कार्य केले.
अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या जातीतील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह स्थापन केले. अशाप्रकारे अनेक जातीनिहाय संस्था कोल्हापुरात स्थापन केल्या .आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांची फी माफ करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. धार्मिक विधींचे प्रशिक्षण देण्यासाठी सत्यशोधक शाळा सुरू केली.याबरोबरच देशातील अनेक संस्थांना, वसतीगृहांना, मुलांना त्यांनी मदत आणि देणगी दिली असे ही ते म्हणाले. यावेळी आनंद गांधी, उद्योजक गणेशजी गुगळे, पत्रकार पिटर रणशिंग इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक सतिश ओहोळ यांनी केले तर आभार रोहिदास कांबळे सर यांनी मानले.