लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. २ जुलै २०२४ :
संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२४ नुसार येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील सर्व भागांमध्ये मतदार यादीमध्ये नाव दुरुस्ती,नाव समाविष्ट करणे आणि नाव वगळणे याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे. याकरिता बीएलओ मार्फत घरोघरी जाऊन मतदारांची सर्वेक्षण केले जाणार आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये योग्य व पात्र मतदार यादीत नोंदणीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. अशी माहिती श्रीगोंदा तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे यांनी दिली.
मतदार यादीमधील मयत मतदारांची नाव वगळणी करून मतदार यादी परिपूर्ण करणे.संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२४ मध्ये दिनांक २५ जुलै २०२४ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे तसेच अंतिम मतदार यादी २० ऑगस्ट २०२४ रोजी प्रसिद्ध होणार आहे. ही अंतिम मतदार यादीच विधानसभेकरिता ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे तालुका मतदारसंघातील सर्व यादी भागातील सर्व मतदारांनी आपले नाव नोंदणी, नाव दुरुस्ती व नाव वगळणी याबाबतची नोंदणी आपले बीएलओ यांच्यामार्फत करावी असे आवाहन तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे यांनी केले आहे.