लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. ४ जुलै २०२४ :
तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की शिधापत्रिकेमधील नाव कमी करणे, नाव समाविष्ट करणे, नविन, विभक्त व दुबार शिधापत्रिका करणे, याबाबतचे सर्व अर्ज संबंधित स्वस्त धान्यदुकानदार यांचेकडे देण्यात यावे. संबंधित स्वस्त धान्यदुकानदार यांना त्याप्रमाणे सुचना निर्गमित केलेल्या आहेत.
संबंधित भागातील नागरिकांनी शिधापत्रिकेबाबत अर्ज स्वस्त धान्यदुकानदार यांचेकडेस दिल्यानंतर धान्य दुकानदार यांनी तालुक्यातील पुरवठा विभागाशी संपर्क करून शिधापत्रिकाबाबत केलेल्या मागणीनुसार तातडीने कारवाई करून ती संबंधित नागरिकांना देण्यात यावी यासाठी नागरिकांनी तहसिल कार्यालयामध्ये येण्याची आवश्यकता नाही.
शिधापत्रिका ही ऑनलाईन प्रणालीद्वारे जसे कि उत्पन्न दाखला, नॉन क्रिमिलयेर त्याच प्रमाणे नवीन / विभक्त दुबार शिधापत्रिका तसेच नाव कमी, नाव समाविष्ट ऑनलाइन प्रणाली मध्ये करणे कामी सर्व सेतू
चालकांची बैठक मा.जि. पुरवठा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेली आहे. त्यांना ऑनलाईन शिधापत्रिकाबाबत प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. त्यासाठी कोणीही तहसील कार्यालय मध्ये येऊन अर्ज करण्याची आवशक्यता नाही. यामुळेनागरिकांची सोय होणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. यास्तव सर्व नागरिकांनी शिधापत्रिकाबद्दल सर्व कामकाजास्तव संबंधित सेतू चालक यांचेशी संपर्क करून ऑनलाईन घेणेबाबत सर्व नागरिकांना तहसिलदार श्रीगोंदा यांच्या कडून आवाहन करण्यात येत आहे.