लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरा घरच्या घरी..! कसा फॉर्म भरणार? पहा संपूर्ण माहिती..!

लाडकी बहीण योजनेचा फॉर्म घरच्या घरी कसा भराल? फॉर्म झटपट डाऊनलोड करा..!

लोकक्रांती
CM Ladki Bahin Yojna :
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत महिन्याला १५००/- रुपये मिळणार. त्यासाठी सरकारी कार्यालयात जाऊन फॉर्म भरण्याऐवजी ऑनलाईन फॉर्म भरण्याची सोपी पद्धत वापरता येईल. जाणून घ्या प्रक्रिया. लाडकी बहीण योजनेचा फॉर्म घरच्या घरी कसा भराल? फॉर्म झटपट डाऊनलोड करा.

मुंबई : महायुती सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात नुकतीच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची घोषणा केली होती. या योजनेतंर्गंत अल्प उत्पन्न गटातील २१ ते ६५ वयोगटाच्या महिलांना महिन्याला १५००/- रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी योजनेची घोषणा केल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी राज्यभरातील सरकारी कार्यालयामध्ये महिलांची मोठी झुंबड उडाली आहे. प्रचंड गर्दीमुळे अनेक ठिकाणी महिलांना योजनेसाठी अर्ज दाखल करता आलेले नाहीत. मात्र, महिलांना हा फॉर्म घरच्या घरी ऑनलाईन पद्धतीनेही भरता येईल. त्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पीडीएफ फाईल डाऊनलोड करुन तुम्हाला त्यावर नाव, पत्ता आणि इतर सगळे तपशील भरावे लागतील. त्यानंतर हा भरलेला फॉर्म पुन्हा संकेतस्थळावर अपलोड करुन, त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून तो सबमिट करावा लागेल.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतंर्गत महिन्याला १५००/- रुपये मिळणार. त्यासाठी सरकारी कार्यालयात जाऊन फॉर्म भरण्याऐवजी ऑनलाईन फॉर्म भरण्याची सोपी पद्धत वापरता येईल. जाणून घ्या प्रक्रिया.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भराल?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जो अर्ज देण्यात आला त्यावर इतर सरकारी कामांसाठी आपण ज्याप्रकारे वैयक्तिक तपशील भरतो, तीच पद्धत वापरायची आहे. या फॉर्ममध्ये महिलांना आधी त्यांचे संपूर्ण नाव, पत्ता, जन्म ठिकाण, पिनकोड ही माहिती भरावी लागेल. याशिवाय, तुमच्या बँक खात्याशी जोडलेला मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांकही न विसरता अर्जात नमूद करावा. याशिवाय, महिलांना वैवाहिक स्थितीच माहिती देणेही अर्जात बंधनकारक आहे.

यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला ज्या बँक खात्यामध्ये हवे आहेत, त्याचा तपशील भरावा लागेल. यामध्ये बँकेचे पूर्ण नाव, बँक खातेधारकाचे नाव, बँक खात्याचा क्रमांक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संबंधित बँकेचा IFSC Code हे सर्व तपशील अचूक भरावे लागतील.

याशिवाय, या अर्जात तुम्ही कोणत्या सरकारी योजनेचा लाभ घेत आहात का? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. एखादी महिला सरकारी योजनेची लाभार्थी असेल तर तिला संबंधित योजनेच्या माध्यमातून महिन्याला किती पैसे मिळतात, हे अर्जात नमूद करावे लागेल.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास तुमचा आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला असणे महत्त्वाचे आहे. त्याचा तपशीलही अर्जात नमूद करावा लागेल. सगळ्या शेवटी अर्ज भरणारी महिला कोणत्या वर्गात मोडते, हे स्पष्ट करावे लागेल. अर्ज भरणारी महिला सामान्य गृहिणी असेल किंवा ती सरकारी नोकर नसेल तर सामान्य गृहिणी या पर्यायासमोर खुण करावी.

कोण असणार पात्र?

* महाराष्ट्र रहिवासी
* विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
* लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.२.५० लाखापेक्षा जास्त नसावे
* ६० वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल

अपात्र कोण असेल?

* २.५० लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे
* घरात कोणी टॅक्स भरत असेल तर
* कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर
* कुटुंबात ५ एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर
* कुटुंबातील सदस्यांकडे ४ चाकी वाहन असेल तर ( ट्रॅक्टर सोडून )

लागणारी कागदपत्रे

आधारकार्ड , रेशनकार्ड , उत्पन्नाचा दाखला , रहिवासी दाखला , बँक पासबुक , अर्जदाराचा फोटो, अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र, लग्नाचे प्रमाणपत्र

योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अँप बर/सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे.ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
few clouds
33.3 ° C
33.3 °
33.3 °
20 %
4.8kmh
16 %
Thu
33 °
Fri
37 °
Sat
37 °
Sun
37 °
Mon
39 °
error: Content is protected !!