नगर जिल्ह्याने राष्ट्रवादी काँग्रेसला आतापर्यंत मोठी ताकद दिली! नाहाटांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे श्रीगोंद्याच्या राजकारणामध्ये निश्चितच चांगले घडेल; विरोधी पक्षनेते अजितदादा पवार..!

टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि. ३ सप्टेंबर २०२२ : राज्याचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार श्रीगोंदा दौऱ्यावर असताना विविध विकास कामांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आली व प्रवीणकुमार उर्फ बाळासाहेब नाहाटा यांच्या अभिष्टचिंतन व पक्षप्रवेश सोहळ्यास त्यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार राहुल जगताप होते.

यावेळी जनसमुदायाला संबोधित करत असताना ते म्हणाले अडीच वर्षाच्या काळामध्ये कोरोना सारखी अनेक संकटे आली परंतु त्यामध्ये अर्थव्यवस्था सावरण्याचा व शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आम्ही घेतले परंतु सुरतमार्गे गुवाहाटीला जाऊन अशे काहीतरी निर्णय जवळचेच घेतील असे वाटले नव्हते.उध्दव ठाकरे म्हणाले राष्ट्रवादी एकजुटीने राहिला काँग्रेस पक्ष एकजुटीने राहिला परंतु स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना जे वाटत होते की शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला पाहिजे पणत्यांचाच मुलगा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी दगा फटका केला. सर्वांचे लक्ष सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे लागले होते परंतु तारीख पे तारीख तारीख पे तारीख पडत आहेत निकाल द्यावा असं सामान्यांना वाटत आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधाना मुळे भारतदेश काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत एकसंघ राहिला.

आता तर वेगवेगळ्या घोषणा समोर येत आहेत जसे की ५० खोके एकदम ओके या आधी अनेक मुख्यमंत्री होऊन गेले महाराष्ट्र मध्ये सुसंस्कृत राजकारण पाहायला मिळाले परंतु आता परिस्थिती वेगळी पाहायला मिळते.१४५ चा आकडा कमी झाला की हे सरकार पडेलअसं मी सांगत असतो परंतु काहीजण बोलतात की हे सरकार पंचवीस वर्षे टिकेल आधी पाच वर्षे टिकले नाही उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला असं काहीतर चालू आहे.

नगर जिल्ह्याने राष्ट्रवादी पक्षाला मोठी ताकद दिलेली आहे त्यामध्ये तीन आमदार आज या कार्यक्रमास उपस्थित आहेत तसे जरी तालुक्यात च्या सर्व जागा आल्या ही जागा जाईल असे वाटले नव्हते रमेश आप्पांचा ७०० मतांनी पराभव झाला अशा दोन ठिकाणी अपयश आले ठराविक आमदार सोडले तर बाकीच्या बहुतेक ठिकाणी आमदार हे पहिल्यांदा निवडून आलेले आहेत आता बाळासाहेब नाहाटा यांना सुध्दा राज्य बाजार समिती वर संधी दिली. माझी कामाची पद्धत फार वेगळी आहे शेवटच्या माणसापर्यंत मदत कशी करता येईल ते आम्ही पाहतो असेही ते बोलताना म्हणाले.

तुम्ही बारामती मध्ये या प्रत्येक वेळी तुम्हाला नवीन काहीतरी झालेल्या दिसेल पण इथे तीन-चार वर्षे डिव्हायडरचे काम चालू आहे रस्ते तर खड्डेमय झाले आहेत स्वच्छता नाही डिव्हायडर मध्ये झाडे नाहीत काम दर्जेदार झाली पाहिजे कारण पैसा हा जनतेचा आहे सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षाला दीड लाख कोटी रुपये खर्च होतो काम करत असताना काहीतरी नाव निघेल असे काम केले पाहिजे.मीडियावर बोलताना ते म्हणाले गणपती दर्शनाला जाणारे तेच तेच व्हिडिओ कशासाठी दाखवता तो ज्याचा त्याचा श्रद्धेचा भाग असतो.

बाळासाहेबांच्या पक्षप्रवेशामुळे श्रीगोंद्याच्या राजकारणामध्ये निश्चित चांगलेच घडेल राष्ट्रवादीची स्थापना होऊन आता जवळपास २३ वर्षे झाली आहेत त्यामुळे आम्ही आधीचे तुम्ही आत्ता आले एकमेकांबद्दल बोलण्याचे काही कारण नाही असेही त्यांनी सांगितले काम करणाऱ्यांना संधी देणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी पक्षाकडे बघितले जाते.समविचारी लोकांमध्ये जर मतांचे विभाजन झाले तर नको त्याचेच साधते.

जनतेतून सरपंच नगराध्यक्ष या सरकारच्या निर्णयावरही त्यांनी सडकून टीका केली मार्केट कमिटीची निवडणूक आमदारांसारखी व्हायला पाहिजे असे मत बाळासाहेब नाहाटा व अशोक डक या प्रमुखांनी बोलून दाखवली तो खर्च सरकारने करावा ही भूमिका आम्ही पणन विभागाकडे करणार असेही ते म्हणाले.

इतके दिवस बाळासाहेब नाहाटा हे कोणत्या पक्षाचे हे आपल्याला दुर्बिन लावून तपासावा लागत होते परंतु तालुक्याच्या वतीने मी विनंती करतो जोपर्यंत अजितदादा पवार मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत पक्ष सोडायचा नाही अजित दादा तुम्ही जी भूमिका देताल ती सक्षमपणे पार पाडू असं माजी आमदार राहुल जगताप बोलताना म्हणाले.

कोणत्याही पदाची जबाबदारी असू द्या त्याची कामगिरी भक्कमपणे पेरण्याची क्षमता अजितदादांमध्ये आहे असं मत घनश्याम शेलार यांनी व्यक्त केले.तालुक्यामध्ये नाहाटा पॅटर्न म्हणून बाळासाहेब पुढे आले दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे असे दीपक भोसले बोलताना सांगितले. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंत दादा पाटील यांनी जे पद भूषवले ते पद अजितदादांनी श्रीगोंदा तालुक्यासाठी दिले असे टिळक भोस म्हणाले.

बाळासाहेब नाहाटा हे विचार मांडताना म्हणाले २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार २००० मतांनी पराभूत झाला त्यावेळी मात्र अशा प्रकारची मोट बांधण्याचा प्रयत्न झाला असता तर आता चित्र वेगळे असते. परंतु तालुक्याची पाच वर्षे वाया गेले कुठल्याच प्रश्नावर बोलले जात नाही.स्वर्गीय शिवाजीबापू नागवडे, स्वर्गीय कुंडलिकराव जगताप, स्वर्गीय तुकाराम दरेकर, हे माणसे गेली आणि हा तालुका पोरका झाला. आज या तालुक्याला सक्षम नेतृत्वाची गरज आहे राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीचा उमेदवार श्रीगोंद्यातून विधानसभेला पाठवण्याचे आम्ही काम करू सर्व नेते मंडळींना एकत्र करून मोट बांधून सक्षम नेतृत्व अजितदादा तुम्ही द्या निश्चितच राष्ट्रवादीचा आमदार विधानसभेत गेल्याशिवाय राहणार नाही असा शब्द देतो असे बाळासाहेब नाहाटा यांनी बोलताना मत व्यक्त केले.

यावेळी माजी आमदार राहुल जगताप,घनश्याम शेलार,बाळासाहेब नाहाटा,टिळक भोस, दिपक भोसले,हरिदास शिर्के यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास उपस्थित शिरूरचे आमदार अशोकबापू पवार,आमदार,संग्राम जगताप, काँग्रेस तालुका अध्यक्ष दिपक भोसले,माजी आमदार रमेशअप्पा थोरात,आमदार निलेश लंके, आमदार प्राजक्त तनपुरे,मुंबई बाजार समिती सभापती अशोक डक,जिल्हा बँकेचे माजी चेरमन सिताराम गायकर,प्रशांत गायकवाड,श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय जामदार,विरधवन जगदाळे, राजेंद्र फाळके,बाळासाहेब हराळ, बाबासाहेब भोस, घनश्याम शेलार, नगराध्यक्षा शुभांगी पोटे,सिद्धार्थ मुरकुटे,प्रशांत गायकवाड, अण्णाभाऊ साठे यांच्या सुनबाई सावित्रीबाई साठे,प्रीतम कुमार, हरिदास शिर्के, यांच्यासह यावेळी मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टिळक भोस यांनी केले.
स्त्रोत:(आयोजित कार्यक्रम)

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
25.9 ° C
25.9 °
25.9 °
66 %
10.1kmh
99 %
Mon
26 °
Tue
26 °
Wed
25 °
Thu
29 °
Fri
30 °
error: Content is protected !!