शेडगावचे सुपुत्र गणेश राऊत यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित..!

तांदळी दुमाला ग्रामपंचायतने गावच्या विकास कामांचा झपाटा सुरू ठेवलाय..!

लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. ८ जुलै २०२४ :
आमदार बबनराव पाचपुते यांच्याकडे तांदळी दुमाला ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच तसेच माजी उपसरपंच सर्व सदस्य आणि ग्रामसेवक यांनी सतत पाठपुरावा करून तांदळी दुमाला गावातील गंगाधरे वस्ती हा रोड डांबरीकरण करण्यासाठी १ कोटी ६३ लक्ष रुपये निधी शासनाकडून प्राप्त केला. या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार पुत्र विक्रम पाचपुते यांचे हस्ते करण्यात आले.

तांदळी दुमाला ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच संजय निगडे,उपसरपंच तुषार धावडे तसेच माजी उपसरपंच राजेंद्र भोस सर्व सदस्य व ग्रामसेवक गावाच्या विकासासाठी हाती घेतलेल्या विकास कामांचे प्रत्येक वार्डाच्या कानाकोपऱ्यापर्यंत गावकऱ्यांच्या मूलभूत सोयी सुविधांचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन आमदार बबनराव पाचपुते यांच्याकडे विकास कामांचा पाठपुरवठा करून आपल्या गावातील गंगाधरे वस्ती हा रोड डांबरीकरण करण्यासाठी १ कोटी ६३ लक्ष रुपये निधी मंजूर करून घेतला. या कामाचे भूमिपूजन आमदार पुत्र विक्रम पाचपुते यांचे हस्ते करण्यात आले. गावाच्या विकास कामासाठी विक्रम पाचपुते यांचे कडे अजून काही भरीव निधी आणण्यासाठी सरपंच यांच्या सह सर्व टीमचा पाठपुरावा चालू आहे या विकास कामांना ग्रामपंचायत चे सर्व पदाधिकारी तसेच गावकर्यांनी मोलाचे सहकार्य केले.

यावेळी उदघाटन कार्यक्रमासाठी सरपंच संजय निगडे,उपसरपंच तुषार धावडे,माजी उपसरपंच राजेंद्र भोस ,माजी उपसरपंच महेश भोस ,ग्रामपंचायत सदस्य संतोष हराळ ,नर्सिंग भोस, भरत शेळके, तसेच नानासाहेब हराळ,यात्रा कमिटी अध्यक्ष संदीप रोडे, माजी सरपंच हावसरव बोरुडे ,माजी सरपंच देविदास भोस,पोलीस पाटील अनिल शेळके ,लक्ष्मण भोस, ह.भ. प.आबासाहेब नवले,दत्ता अबा भोस, अनिल
गंगाधरे, भाऊसाहेब धालवडे, तसेच गावातील सर्व आजी माझी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.

चौकट
आमदार बबनराव पाचपुते यांच्या कडून आणखी विकास कामांसाठी निधी प्राप्त करून गावासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी या पुढेही पाठपुरावा करणार आहे. गावाची विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू असून विकास कामांचा झपाटा असाच सुरु ठेवणार. — सरपंच संजय निगडे, तांदळी दुमाला.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
29.4 ° C
29.4 °
29.4 °
53 %
8.8kmh
100 %
Sun
29 °
Mon
29 °
Tue
29 °
Wed
31 °
Thu
33 °
error: Content is protected !!
WhatsApp Group