गजबजलेल्या शनीचौक परिसरावर आता सीसीटीव्ही ची नजर..!

सतीष बोरुडे मित्र मंडळाचा सामाजिक उपक्रम..!

लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. १० जुलै २०२४ :
शहरातील प्रशासकीय दृष्ट्या महत्त्वाचा भाग असणारा शनी चौक परिसर आहे या ठिकाणी पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यलय,भूमी अभिलेख कार्यलय, पंचायत समिती व तालुक्यांतील ईतर महत्वाच्या व्यक्तींची कार्यलये आहेत. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा सुरु असते तसेच दिवसरात्र रहदारी असते. सामाजिक कार्यकर्ते सतिश बोरुडे यांनी टिळक भोस यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून सहकाऱ्यांच्या मदतीने सामाजिक भावनेतून या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम केले आहे. या कामा साठी शनी मारुती देवालय ट्रस्ट अध्यक्ष व विश्वस्तांनी सीसीटीव्ही लावण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली.

शनिचौक या ठिकाणी दुचाकी अथवा किरकोळ चोरीच्या घटना सातत्याने घडत असतात. ठराविक काही समाजातील व्यक्तींच्या भांडण, दगडफेक, विवस्त्र होणे अशा घटना नित्याच्या आहेत. ज्यामुळे येथील स्थानीक नागरीक व्यापारी यांच्या मध्ये दहशतीचे वातावरण आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याची मागणी अनेक दिवसांपासून स्थानिक नागरिक करत आहेत. याबाबत लोकप्रतिनिधींनी संपूर्ण शहरात सीसीटीव्ही बसवू अशी घोषणा अनेक वर्षांपासून केली होती जिल्हा नियोजन मधून निधी उपलब्ध करून देऊ अश्या बातम्या काही नगरसेवक यांच्या मार्फत प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र त्यावर ठोस अशी कार्यवाही अद्याप ही झाली नाही.

या सर्व गोष्टींचा अभ्यास करून या परिसरातील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते सतिश बोरुडे यांनी टिळक भोस यांच्या जन्मदिवसा निमित्त सहकाऱ्यांच्या मदतीने सामाजिक भावनेतून या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम केले आहे. या कामा साठी शनी मारुती देवालय ट्रस्ट अध्यक्ष व विश्वस्तांनी सीसीटीव्ही लावण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली यामुळे आता शनी चौक परिसरात सीसीटीव्ही ची नजर राहणार आहे वारंवार होणाऱ्या बेकायदेशीर घटना भांडणे, यांना चाप बसन्यास मदत होईल. याचप्रमाणे संपूर्ण श्रीगोंदा शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अश्या प्रकारची मागणी नागरिकांन मधून होत आहे.

चौकट
शहरातील डीव्हायडर मधील वृक्षारोपण, मांडवगण रोड ते खंडोबा मंदिर रस्ता दुरुस्ती, रस्ता, पाणी, विज, स्ट्रीट लाईट सह सर्व नागरीसुविधा, करिता बोरुडे यांचा पाठपुरावा सातत्याने सुरु असतो. स्थानीक नागरिकांच्या मदतीने श्रीगोंदा शहराचा चेहरमोहरा बदलण्या साठी लढा उभारू. — टिळक भोस

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
22 ° C
22 °
22 °
97 %
4.3kmh
100 %
Mon
22 °
Tue
24 °
Wed
24 °
Thu
26 °
Fri
28 °
error: Content is protected !!