लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. ११ जुलै २०२४ :
लग्नासाठी मुली मिळत नसल्याने त्याचा गैरफायदा घेत बनावटी लग्न करुन फसवणुक करण्याचा प्रकार श्रीगोंदा तालुक्यात घडला. श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीतील बनावटी लग्न करून फसवणूक करणारी अंतरराज्यीय टोळी पोलिसांनी मुद्देमालासह जेरबंद केली आहे. नितीन अशोक उगले वय ३१ वर्षे, मुंगूसगाव, ता. श्रीगोंदा, जि.अहमदनगर यांनी दिनांक २८ जून २०२४ रोजी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादीत नमूद केलेल्या आरोपींनी संगनमत करून फिर्यादीस आरोपी हिच्यासोबत लग्न करून संसार करण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी त्यांनी २ लाख १५ हजार रुपये घेतले.
याबाबत अधिक माहिती अशी की यवतमाळ येथून चारचाकी गाडी बोलावून त्यांच्याशी फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीची आईने आरोपींना पकडले असता आशा गौतम पाटील हिने तिच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून हल्ला केला व हाताने मारहाण केली.
गुन्हा केलेले आरोपी आशा गौतम पाटील, सिमरन गौतम पाटील, शेख शाहरुख, शेख फरीद, दिपक पाडुरंग देशमुख, अर्जुन रामराव पाटील, सचिन बलदेव राठोड या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपासाच्या दरम्यान पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या नेतृत्वाखालील टीमने तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून फसवणुकीची रोख रक्कम व चारचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. एकूण १३ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, आरोपींना ११ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक मा. राकेश ओला अहमदनगर, अपर पोलीस अधीक्षक मा. प्रशांत खैरे अहमदनगर, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग मा.विवेकानंद वाखारे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, श्रीगोंदा शहर बिटाचे अंमलदार पोहेकॉ मुकेशकुमार बड़े व त्यांचे मदतनिस पोकों प्रविण गारुडकर, पोकॉ आनंद मैड, पोकॉ संभाजी गर्जे,मपोकॉ अरुणा खेडकर, मपोकॉ आस्मीता शेळके- खेतमाळीस
अंमलदार हे करित आहेत.