कुकडी प्रकल्पातील पाणी प्रश्नाबाबत दिलीपराव वळसे पाटील यांची मागणी मान्य करू नये याविषयी बाळासाहेब थोरात यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र..!

वळसे पाटील यांनी कुकडी प्रकल्पाबाबत केलेल्या मागण्या ह्या श्रीगोंदा, कर्जत व करमाळा तालुक्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर घोर अन्याय करणाऱ्या आहेत..!

लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. ११ जुलै २०२४ :
राज्याचे सहकार मंत्री व आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीपराव वळसे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना दिनांक २५ जून रोजी पत्र देऊन कुकडी प्रकल्पाशी संबंधित काही विषयावर बैठक आयोजित केलेली आहे या बैठकीत त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत ते सर्व विषय कुकडी डाव्या कालव्यावर अवलंबून असणाऱ्या श्रीगोंदा, कर्जत व करमाळा तालुक्यातील कुकडी लाभधारक शेतकऱ्यांवर अन्याय करणारे आहेत त्यामुळे या बैठकीत त्यांनी मागणी केलेल्या विषयावर निर्णय होऊ नये यासाठी बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे आग्रह धरावा अशी मागणी

त्यांनी दिलेले पत्र व त्यातील विषय व त्यामुळे कुकडी लाभक्षेत्रातील श्रीगोंदा कर्जत व करमाळा या तालुक्यावरती कसा अन्याय होतो याबाबतची सविस्तर माहिती

१ ) आंबेगाव, शिरूर व जुन्नर तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यासाठी त्यांनी २.५५ पीएमसी पाणी कुकडी प्रकल्पातून आरक्षित करावे अशी मागणी त्यांनी केलेली आहे. ही मागणी पूर्णतः चुकीची आहे तर कुकडी प्रकल्पातील धरणे पूर्ण क्षमतेने भरले तरीही प्रत्येक वर्षी श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यावर शेतीच्या पाण्यासाठी अन्याय होतो वळसे पाटील यांनी मागणी केल्याप्रमाणे २.५५ टीएमसी पाणी दिल्यास श्रीगोंदा तालुक्यात शेतकऱ्यांना पाणीच मिळणार नाही तर कर्जत व करमाळा तालुक्याला पाणी मिळण्याचा विषयच शिल्लक राहणार नाही

२ ) आंबेगाव तालुक्यातील लोणी धामणी परिसरातील शेतीसाठी उपसा सिंचन योजनेची मागणी त्यांनी केलेली आहे अशा चार उपसा सिंचन योजनेच्या मागण्याचा समावेश या मागणीत आहे .
त्यांची ही मागणी कुकडीच्या मूळ प्रकल्प अहवालाशी विसंगत असून उपलब्ध पाण्यातून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनाच त्यांच्या हक्काचे पाणी मिळत नाही त्यामुळे कुकडी लाभक्षेत्रातील श्रीगोंदा, कर्जत करमाळा तालुक्यातील कायम अन्याय होत आलेला आहे त्यामुळे त्यांची ही मागणी शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे.

३ ) डिंबे ते माणिकडोह बोगदा रद्द करावा अशी त्यांची मागणी आहे. कुकडी डावा कालवा २५९ किलोमीटर लांबीचा कालवा असून हा कालवा येडगाव धरणातून आहे येडगाव धरण हे केवळ १९४४ एमसीएफटी क्षमतेचे धरण आहे म्हणजेच हे धरण दोन टीएमसी चे सुद्धा नाही कुकडी प्रकल्पातील अन्य धरणातून पाणी घेऊन या कालव्याद्वारे करमाळ्या पर्यंत पाणी देण्याची तरतूद प्रकल्प अहवालात आहे त्यापैकी डिंबे धरणातून सव्वा सहा टीएमसी पाणी घेण्याची तरतूद आहे मात्र हे सव्वा सहा टीएमसी पाणी आज पर्यंत कधीही येडगाव धरणात आले नाही व ते या टनेल शिवाय शक्यही नाही हाताने नसल्यामुळेच या कालव्यावरील श्रीगोंदा, कर्जत व करमाळा या तालुक्यातील शेतकऱ्यावर नेहमीच अन्याय होतो तर डिंभे धरण १००% भरून त्याचे पाणी ओव्हरफ्लोने समुद्राला जाते डिंबे माणिकडोह बोगदा झाल्यास समुद्राला वाहून जाणारे पाणी हे कधीच न भरणाऱ्या माणिकडोह धरणात येऊ शकते व कुकडी डाव्या कालव्याचे हक्काची सव्वा सहा टीएमसी पाणी जळगाव धरणात येऊ शकते त्यामुळे कुकडी लाभक्षेत्रातील डाव्या कालव्यावरील कोणत्याही तालुक्यावर अन्याय होणार नाही म्हणून हा बोगदा होणे नितांत गरजेचे आहे.

सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी कुकडी प्रकल्पाबाबत केलेल्या वरील तीनही मागण्या ह्या श्रीगोंदा, कर्जत व करमाळा तालुक्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यावर घोर अन्याय करणाऱ्या आहेत कुकडी प्रकल्पातील माणिकडोह धरण कधीही पूर्ण क्षमतेने भरत नाही त्यामुळेच माणिकडोह धरण 100% भरावे डिंबे धरणाचे ओव्हरफ्लोचे पाणी समुद्राला जाण्याऐवजी या बोगद्या मधून ते माणिकडोह धरणात यावे यासाठी हा बोगदा होणे नितांत गरजेचे आहे मात्र वळसे पाटील साहेबांनी या बोगद्याच्या कामास कायमच विरोध केलेला आहे तर त्यांनी नव्याने कुकडी प्रकल्पातील पाणी पुणे जिल्ह्याला वळवण्यासाठी अन्य दोन मागण्या केल्या आहेत वळसे पाटील यांनी जी बैठक आयोजित करायला सांगितलेली आहे त्या बैठकीत जर त्यांच्या मागणीप्रमाणे सोयीचे निर्णय झाले तर भविष्यात कुकडी डाव्या कालव्यावर अवलंबून असणाऱ्या श्रीगोंदा, कर्जत, पारनेर व करमाळा या तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळणार नाही व हा भाग पूर्णपणे उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही.

वळसे पाटील यांनी केलेल्या मागण्यांपैकी वरील तीनही मागण्या श्रीगोंदा, कर्जत पारनेर व करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांवर घोर अन्याय करणाऱ्या असून त्यांच्या अयोग्य मागण्यास सक्त विरोध करण्यासाठी आपणाकडून मुख्यमंत्री महोदय व सरकारकडे सक्त विरोध केला जावा व कुकडी लाभक्षेत्रातील श्रीगोंदा, कर्जत व करमाळा या तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय न होता त्यांना दिलासा देण्यासाठी आपणाकडून आग्रही मागणी व्हावी ही मागणी बाळासाहेब थोरात यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
clear sky
38.3 ° C
38.3 °
38.3 °
9 %
6.8kmh
2 %
Thu
38 °
Fri
37 °
Sat
38 °
Sun
38 °
Mon
39 °
error: Content is protected !!