लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. ११ जुलै २०२४ :
तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित सोनिया गांधी तंत्रनिकेतन मध्ये विविध कोर्सेस साठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून मान्यता. हे आहेत कोर्सेस डिप्लोमा इन फायरसेफ्टी इंजिनिअरिंग (FR) ऍडव्हान्स डिप्लोमा इन मेडिकल लाबोरेटरी टेकनॉलॉजि (DMLT). ऍडव्हान्स डिप्लोमा इन एनर्जी मॅनॅजमेण्ट & ऑडिट (EW). ऍडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी (ADIS) वरील AICTE कोर्स ला मान्यता मिळाली.
तालुक्यातील ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना पुणे मुंबई येथे कोर्स करण्यासाठी जावे लागत होते,परंतु आता त्यांची शिक्षणाची सोय श्रीगोंदा शहरातच झालेली आहे. तसेच सोनिया गांधी तंत्रनिकेतन मध्ये महाराष्ट्र शासन.AICTE मान्यता प्राप्त डिप्लोमा कोर्सेस याआधीच चालू आहेत. सिव्हील इंजिनिअरिंग कॉम्पुटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक टेलीकॉम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल ईजिनिअरिंग, मँकॅनिकल ईजिनिअरिंग वरील कोर्सेस चा ग्रामीण भागातील तसेच इतर शहरातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केले.